घरमुंबईशारीरिक संबंधाचे व्हिडिओ दाखवून कॉलेज तरुणीवर बलात्कार

शारीरिक संबंधाचे व्हिडिओ दाखवून कॉलेज तरुणीवर बलात्कार

Subscribe

सांताक्रुज येथील घटना; बलात्काराच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी

जेवणातून गुंगीचे औषध देऊन एका 22 वर्षीय कॉलेज तरुणीवर बलात्कार करुन शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करणार्‍या एका आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत अनंत पाटील असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गरोदर राहिलेल्या या तरुणीचा आरोपीने एका खाजगी रुग्णालयात गर्भपात केला होता. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिडीत तरुणी ही गोरेगाव परिसरात राहते. सध्या ती सांताक्रुज येथील कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहेत. प्रशांत पाटील हा तिच्या परिचित असून तिचा दूरचा नातेवाईक आहे. जुलै 2017 रोजी तो तिच्या कॉलेजजवळ आला होता. तिला जेवणाची ऑफर देऊन त्याने तिला अंधेरीतील आंबोली परिसरात त्याच्या बहिणीच्या फ्लॅटमध्ये आणले. तिथेच त्याने तिला जेवणातून गुंगीचे औषध दिले होते. ती बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या अत्याचाराचे त्याने मोबाईलवरुन व्हिडीओ बनविला होता.

- Advertisement -
हे वाचा – मुंबईच्या लाईफलाईनवर दहशतवादाचे सावट; हायअलर्ट जारी

शुद्धीवर येताच त्याने तिला ते व्हिडीओ दाखवून तिला धमकी देण्यास सुरुवात केला. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचा व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर तो तिला तोच व्हिडीओ दाखवून तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करीत होता. याच दरम्यान ही तरुणी गरोदर राहिली होती. तिने हा प्रकार प्रशांतला सांगितला. त्यानंतर त्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका खाजगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला होता. या घटनेनंतरही तो तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. तिला तिचे अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याकडे पैशांची मागणी करीत होता.

दीड लाखही उखळले

बदनामीच्या भीतीने तिने त्याला सुमारे दीड लाख रुपये दिले होते. तरीही तो तिला सतत पैशांसाठी धमकी देत होता. त्याच्याकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने गेल्याच आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तिच्या कुटुंबियांनी तिला वेळीच अडविले, त्यानंतर तिची आपलुकीने विचारपूस केल्यानंतर तिने गेल्या दिड वर्षांपासून प्रशांत तिला तिचे अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करीत होता. तसेच त्याला पैसे दिले नाहीतर तो तेच व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

पोलीस हद्दीचा वाद

या घटनेनंतर त्यांनी दिडोंशी पोलिसांत धाव घेतली होती, मात्र हा गुन्हा तिच्या कॉलेज परिसरात घडल्याने दिडोंशी पोलिसांनी त्यांना सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांना तपासाचे आदेश दिले होते.

आरोपी घटस्फोटीत

या तरुणीचा सविस्तर जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी प्रशांतविरुद्ध खंडणी, मारहाण करणे, बलात्कारासह अन्य भादवी तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या पथकाने प्रशांतला विलेपार्ले परिसरातून अटक केली. प्रशांत हा मालाड परिसरात राहत असून त्याचा लोखंडवाला येथे मोबाईल रिपेरिंगचा एक शॉप होता, मात्र त्याने त्याचा व्यवसाय बंद केला होता. तो घटस्फोटीत असून त्याला एक तेरा वर्षांचा मुलगा आहे. प्रशांत हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -