घरताज्या घडामोडीकिन्नर माँ संस्थेचा अभिनव उपक्रम, तृतीयपंथीयांना शिधावाटप करुन मोलाची मदत

किन्नर माँ संस्थेचा अभिनव उपक्रम, तृतीयपंथीयांना शिधावाटप करुन मोलाची मदत

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा सर्वांवर मोठे संकट येऊन उभे राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्बल घटकातील लोकांना पुन्हा आर्थिक संकटांना समोरे जावे लागत आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या संचार बंदीमुळे तृतीयपंथीयांना समोरही अनेक संकटे उभी राहिली आहेत. मात्र त्यांच्या मदतीसाठी किन्नर माँ समाज धावून आला आहे. किन्नर माँ समाजाच्या वतीने तृतीयपंथींना शिधावाटप करण्यात आले. त्यांच्या मदतीमुळे तृतीयपंथीयांना मोठा आधार मिळाला आहे. किन्नर माँ समाजाकडून समाजातील दुर्बल घटकातील लोकांसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.

किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलामा खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या तृतीयपंथी आणि दुर्बल घटकातील लोकांना शिधावाटप करण्यात आले. या महत्त्वाच्या उपक्रमाबाबत तृतीयपंथीयांनी किन्नर माँ समाजाचे खूप खूप आभार मानले. ‘आजच नाही तर आधीच्या कोविडच्या काळातही किन्नर माँ संस्थेने आम्हाला मदत केली आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे किन्नर माँ संस्था नेहमीच आमच्या संकटाच्या वेळी आमच्या पाठिशी उभे राहते. त्याच्यामुळे आम्हाला नेहमीच मोठी मदत होते’, अशा भावना तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

तृतीयपंथीयांनी मिळणार एकरकमी १५०० रुपये

कोरोनाच्या काळात तृतीयपंथीयांना सामाजिक न्याय विभागाकडून एकरकमी १५०० रुपये देण्यात येणार आहेत. तृतीयपंथीय समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल प्रशासनाने उचलले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत दुर्बल घटकातील समाजाचे मोठे नुकसान. त्यांना अनेक आर्थिक बाबींना समोरे जावे लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असे होऊ नये म्हणून सामाजिक न्याय विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या संकटात तृतीयपंथीयांना १५०० रूपयांची आर्थिक मदत, सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -