घरताज्या घडामोडीOxygen Express: विशाखापट्टनमहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार ऑक्सिजन ट्रेन

Oxygen Express: विशाखापट्टनमहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार ऑक्सिजन ट्रेन

Subscribe

मध्यरात्रीच्या सुमारास ऑक्सिजन ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होणार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. राज्यासह देशातही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात रुग्णांना लागणारा वैद्यकीय ऑक्सिजन इतर राज्यांतून पुरवण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ट्रेनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याचे ठरवलंय. यासाठी महाराष्ट्रातून ऑक्सिजन आणण्यासाठी विशाखापट्टनमला विशेष ट्रेन रवाना झाली होती. या ट्रेनवर ऑक्सिजन टँकर ठेवण्यात आले आहेत. विशाखापट्टनममध्ये या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरल्यानंतर आता ही ट्रेन महाराष्ट्राच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला काही तासांतच पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे.

देशातील पहिल्या ऑक्सिजन ट्रेनची वाहतुक विशाखापट्टनमहून मुंबईच्या दिशेने सुरु होईल. आज मध्यरात्रीच्या सुमारास ऑक्सिजन ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या ट्रेनवरील ऑक्सिजन टँकरमध्ये वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आले आहे. या टँकरची वाहतू भारतीय रो-रो रेल्वेमार्फत केली जात आहे. तसेच दुसरी ऑक्सिजन ट्रेनची वाहतूक ही लकनऊ ते बोकरो होणार आहे. ही ट्रेन वाराणासी मार्गे उत्तरप्रदेशला रवाना होईल. ऑक्सिजन ट्रेनच्या वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडॉर लकनऊ ते वाराणसीदम्यान करण्यात आले आहे. यामध्ये २७० किमी अंतर हे अवघ्या ४ तास २० मिनीटमध्ये ६२.३५ किमी तासी वेगाने पार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

लांब पल्ल्याहुन होणाऱ्या ऑक्सिजन वाहतुकीसाठी रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुक जलद आहे. कारण रेल्ले २४ तास धावू शकते परंतु ट्रक चालकांना विश्रांतीची गरज असते. ट्रेनवरुन ऑक्सजन टँकर उतरवण्यासाठी उताराची आवश्यकता आहे. वाहतूक करताना काही ठिकणी उड्डाणपुल वगैरे आहेत. सुलभ वाहतुक करण्यासाठी महाराष्ट्रातही ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीही कोरोना संकट असताना रेल्वेद्वारे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -