घरदेश-विदेशधक्कादायक! दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन

धक्कादायक! दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन

Subscribe

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची माहिती

देशभरात कोरोनाचा उद्रेक होत आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनची गंभीर परिस्थिती आहे. दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा आहे, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. तसंच, सिसोदिया यांनी हरयाणा आणि उत्तर प्रदेशचे पोलीस दिल्लीत येणारे ऑक्सिजनचे टँकर अडवत असल्याचा आरोप केला आहे

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी सांगितलं की अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पूर्णपणे संपला आहे. सरोज, राठी, शांती मुकुंद, तीरथ राम हॉस्पिटल, यूके हॉस्पिटल, जीवन हॉस्पिटलच्या प्रशासनाने ऑक्सिजन जवळजवळ संपत आल्याचं सांगितलं आहे. आम्ही ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असं सिसोदिया म्हणाले. दिल्लीतील ऑक्सिजनच्या संकटामागील सर्वात मोठे कारण म्हणजे हरियाणा-यूपी आहे. तिथली राज्य सरकार, अधिकारी आणि पोलीस त्यांच्या ऑक्सिजन प्लांटमधून दिल्लीला ऑक्सिजन पुरवण्यास परवानगी देत नाही आहेत, असं सिसोदिया म्हणाले.

- Advertisement -

प्रमुख सरकारी रुग्णालयात शिल्लक ऑक्सिजनचा साठा

डीडीयू हॉस्पिटल – १२ तास
बुरारी हॉस्पिटल – ८ तास
आंबेडकर रुग्णालय – २४ तास
आचार्य भिक्षू हॉस्पिटल – १० ते १२ तास
दीपचंद बंधू हॉस्पिटल – ८ तास
संजय गांधी हॉस्पिटल – १२ तास
एलएनजेपी हॉस्पिटल – १२ तास
बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल – ८ ते १० तास

प्रमुख खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा शिल्लक

बीएल कपूर – ८ ते १० तास
बत्रा हॉस्पिटल – ८ ते ९ तास
व्यंकटेश्वरा हॉस्पिटल – ४ तास
स्टीफन्स – १२ ते १५ तास
गंगाराम हॉस्पिटल – १६ ते १८ तास
होली फॅमिली – २४ तास
कमाल पाटपरगंज – ८ ते १० तास
बालाजी – ४८ तास
श्री अग्रसेन – ४८ तास
महाराजा अग्रसेन – ५ तास

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -