घरमुंबईमुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; शाळांना सुट्टी

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; शाळांना सुट्टी

Subscribe

कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज

मान्सून मागील २४ तासांपासून कोकण तसेच गोवा याठिकाणी सक्रिय झाला असून महाराष्ट्रात देखील सर्वच भागात कोसळत आहे. येत्या शनिवार पर्यंत हा परतीचा मानला जाणारा पाऊस अधिकच सक्रिय होऊ शकतो. तसेच कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून मुंबई आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यासह कोकणातील शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.


हेही वाचा- राज्याला परतीचा पाऊस झोडपणार; हवामान खात्याचा इशारा

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळू शकतात. तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

पावसामुळे आजारात वाढ; १५ दिवसांत लेप्टोमुळे २, स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू 

मुंबईत सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर कायम आहे. कडक ऊन, मध्येच अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे पावसाळी आजारांचे प्रमाणही वाढत आहे. मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या पंधरावड्यातच लेप्टोमुळे २ तर स्वाईन फ्लूने एका रूग्णाच्या मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या महिन्यापासून लेप्टो आणि स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने, १५ सप्टेंबरपर्यंत साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात लेप्टोमुळे २ रूग्णांचा बळी गेला होता. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये १ हजार ५३६ डेंग्यू सदृश रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मागील दहा वर्षांतील पावसाच्या नोंदी

 वर्ष                      पाऊस

२०१०               २३६४. ८० मिमी.

२०११               २६०८.५० मिमी.

२०१२               २३२६.३९ मिमी.

२०१३               ३३४७.२३ मिमी.

२०१४              २५२९.६६ मिमी.

२०१५              १६१४.०४ मिमी.

२०१६              २७०६.४२ मिमी.

२०१७              ३१२३.७८ मिमी.

२०१८               २६३६.७८ मिमी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -