घरमुंबईवासिंदच्या जिगरबाज तरुणांनी पुरातून वाचवले १८ जणांचे प्राण

वासिंदच्या जिगरबाज तरुणांनी पुरातून वाचवले १८ जणांचे प्राण

Subscribe

शहापूर तालुक्यातील वासिंद येथे भातसा नदीच्या पुरामुळे भातसई गावाजवळ अडकून पडलेल्या 18 जणांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. यात 9 पुरुष 8 महिला व 1 बारा वर्षाच्या लहान मुलाचा समावेश होता असे बचावकार्यातील तरुण सतिष गायकर यांनी माहिती देताना सांगितले.

भातसा नदीला पूर आल्यानंतर वासिंद नदी किनारी वसलेले भातसई गाव पुराच्या वेढ्यात सापडले होते. शेकडो नागरिक या पुरात अडकून पडले होते. भातसई गावाजवळील पाठारे नर्सरीमध्ये 18 जण अडकून पडल्याची माहिती वासिंदचे स्थानिक तरुण सतिष गायकर , प्रदीप गायकर या दोघा भावंडांना समजताच त्यांनी नदी किनारी पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली.

- Advertisement -

यावेळी दिपक डोंगरे ,चंद्रकांत कदम या मित्रांना बरोबर घेत त्यांनी भातसा नदीत उड्या घेतल्या. जवळील एका सुष्टी फार्म हाऊस येथील होड्या घेऊन त्यांनी मदत कार्य सुरू केले. पुरामुळे अडकून पडलेल्या 18 प्रवाशांना एक तासाच्या अथक परिश्रमाने सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -