घरमुंबईदेहविक्री व्यावसायातून दहा मुलींची सुटका

देहविक्री व्यावसायातून दहा मुलींची सुटका

Subscribe

वसई तालुक्यात दोन घटनांमध्ये दहा मुलींची दलालांच्या तावडीतून पोलिसांनी सुखरूप सुटका केली. यापैकी चार मुली अल्पवयीन असल्याने आरोपींवर पोक्सो आणि पिटा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वसई शहरात माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी रोड जवळील पंचवटी या हॉटेलमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली. त्यानंतर दलालांच्या ताब्यात असलेल्या पाच मुलींची सुटका करण्यात आली. यापैकी चार मुली अल्पवयीन असल्याचे आढळले.

मुंबईतील मालाड भागातील प्रिया परमार (३४) या महिलेवर या मुलींना देहविक्री व्यावसायासाठी बळजबरी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रियावर पिटा आणि पोक्सो अंतर्गत माणिकपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा वसई यांच्याकडून करण्यात आली.

- Advertisement -

दुसरी घटना वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातिवली परिसरातील आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने ही कारवाई केली आहे. मालाड येथिल शहनवाज रहमान खान,साजिद इक्बाल खान,दिपक मुन्नालाल वाल्मिकी या तीन दलालांनी सातीवली येथे पाच मुलींना बळजबरीने देहविक्री व्यावसायाला जुंपले होते. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलींचीही पोलिसांनी सुटका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -