घरमुंबईरिध्दी परबच्या कुटुंबियांना मदत मिळेल का?

रिध्दी परबच्या कुटुंबियांना मदत मिळेल का?

Subscribe

माहितीच्या अधिकाराअंतर्गत ३५ हजार विद्यार्थी चुकून नापास झाले असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ किती विद्यार्थ्यांचे प्राण घेणार आणि हजारो विद्यार्थ्यांना चुकून नापास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बोरिवलीच्या वालिया कॉलेजची विद्यार्थिनी रिध्दी परबने एका विषयात नापास झाल्याने आत्महत्या केली होती. मात्र पुनर्मुल्यांकनात ती उत्तीर्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. रिध्दीच्या आत्महत्येची माहिती कळताच कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी रिध्दीच्या पालकांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये त्यांनी तिच्या पालकांची भेट घेऊन सांत्वन केले. ‘प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांची काळजी असते, परंतु प्रत्येकानेच या घटनेतून धडा घ्यायला हवा. रिद्धी जरी आपल्यात पुन्हा परतणार नसली तरी एका क्षुल्लक चुकीमुळे एक अमूल्य जीव जाऊ शकतो या गोष्टीची प्रत्येकाला जाणीव व्हायला हवी, असे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले. त्याचसोबत अशा घटना यापुढे घडणार नाहीत यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाईल असा शब्द देखील त्यांनी परब कुटुंबियांना दिला आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा आरोप

दरम्यान, कुलगुरुंच्या भेटीवरुन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी आरोप केले आहेत. कुलगुरुंनी परब कुटुंबियांची फक्त मदत घेतली. पण मुंबई विद्यापीठ किंवा राज्य शासनाने कोणतीही आर्थिक मदत करणार असल्याचे कुलगुरुंनी म्हटले नाहीत. त्यामुळे कुलगुरुंनी फक्त सांत्वनपर भेट घेण्याने काय उपयोग असा सवाल अमोल मातेले यांनी केला आहे. आज मंत्रालयात त्यांनी शिक्षणंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी परब कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी विनोद तावडे यांच्याकडे केली. यावर मुंबई विद्यापीठाला मदत करण्यासाठी सांगतो असे आश्वासन तावडे यांनी दिले.

- Advertisement -

म्हणून केली आत्महत्या

माहितीच्या अधिकाराअंतर्गत ३५ हजार विद्यार्थी चुकून नापास झाले असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ किती विद्यार्थ्यांचे प्राण घेणार आणि हजारो विद्यार्थ्यांना चुकून नापास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. लहानपानपासूनच हुशार असलेल्या रिद्धीला आयुष्यात पहिल्यांदाच ‘नापास’ शेरा पाहावा लागला होता. याचा धक्का सहन न झाल्याने तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु, पुनर्मूल्यांकनात रिद्धी पास झाली. यात दोष कोणाचा नाहक विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागते. त्याच बरोबर अनेक विद्यार्थीना आपले आयुष वाया जाण्याची नामुष्की ओढवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -