घरमुंबईऋतु पार्क सोसायटीतील नाल्यावर रस्ता

ऋतु पार्क सोसायटीतील नाल्यावर रस्ता

Subscribe

पावसाळ्यात परिसर जलमय होण्याची भीती

केवळ पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरल्यानंतर प्रशासनाला नाले सफाईची आठवण येते. मात्र इतर वेळेस या नाल्यांवर होत असलेले बांधकाम आणि छोटे होत जाणारे नाले याकडे प्रशासन लक्ष देत नाही. याचा परिणाम शेवटी रहिवाशांच्या आरोग्यावर होत असतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील श्रीरंग, वृंदावन आणि ऋतु पार्क या परिसरातून वाहणार्‍या नाल्यावर रस्ता बांधण्यात आल्याने हा नाला अरुंद झाला आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात या परिसराला पूर स्थितीचा सामना करावा लागल्यास त्याला जबाबदार ठाणे महानगर पालिका असेल असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

श्रीरंग आणि वृंदावनमधून वाहणारा नाला पुढे सुमारे दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या ऋतु पार्क परिसराच्या या संकुलासमोरुन जातो. हा नाला दरवर्षी पावसाळ्यात भरुन वाहतो. त्याचे पाणी ऋतु पार्क परिसरात घुसून नागरिकांना आरोग्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदा या समस्यांमध्ये आणखी एक भीषण संकट निर्माण झाले आहे. पार्कसमोरुन वाहत जाणार्‍या या नाल्यावर रस्ता बांधण्यात येत आहे. त्यामुळे तेथे नाल्याची बॉटलनेक तयार झाली आहे. येथे अडलेले पाणी पुन्हा उलट ऋतु पार्कच्या दिशेने जाऊ लागले आहे. हा अरुंद झालेला नाला पुन्हा रुंद केला नाही तर येणार्‍या पावसाळ्यात नाल्याचे पाणी उलटून पूरस्थिती निर्माण होईल. याबाबत येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -