घरक्राइमवांद्र्याच्या एमएमआरडीए इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉम्बची अफवा; पोलिसांकडून आरोपीला अटक

वांद्र्याच्या एमएमआरडीए इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉम्बची अफवा; पोलिसांकडून आरोपीला अटक

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र पोलीस गेल्या काही दिवसांपासून बॉम्बच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्या फोन कॉल्समुळे हैराण झाले आहेत. पोलिसांना एखादे मोठे ठिकाण किंवा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारे फोन येत असतात. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना वांद्रे परिसरातील एमएमआरडीए इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तपासणी केली असता बॉम्बची बातमी खोटी असल्याचे निर्दशनास आले. (Rumor of bomb in Bandras MMRDA building parking lot The accused was arrested by the police)

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने कानशिलात लगावली, गाल लाल केले; ठाकरे गटाची राहुल नार्वेकरांवर बोचरी टीका

- Advertisement -

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या एमएमआरडीए इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बची माहिती मिळाल्यामुळे बॉम्बशोधक पथकही तातडीने एमएमआरडीएच्या इमारतीत पोहोचले आणि बॉम्बचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना तपासात काहीही आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी बॉम्बची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पकडले. यावेळी बॉम्बची खोटी माहिती देणारा व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणात दादा भुसेंसह आणखी दोन मंत्र्यांचा समावेश; अंधारेंनी गृहमंत्र्यांवरही केले आरोप

- Advertisement -

मंत्रालय उडवून देण्याची काही दिवसांपूर्वीच धमकी

गेल्या महिन्यात महाराष्ट्र पोलीस विभागाला एका अज्ञात व्यक्तीकडून मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. अज्ञात व्यक्तीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलायचे होते. मात्र, मुख्यमंत्र्यांशी बोलू न शकल्याने त्यांने मंत्रालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी फोन करणार्‍याचा शोध घेण्यासाठी तातडीने शोध मोहीम करण्यास सुरुवात केली आणि आरोपीला ताब्यात घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -