घरमुंबईसचिन वाझेचा चालक सरकारी साक्षीदार

सचिन वाझेचा चालक सरकारी साक्षीदार

Subscribe

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा पोलीस वाहनावरील चालक सरकारी साक्षीदार बनला आहे. मंगळवारी या चालकाची साक्ष न्यायाधीश यांच्यासमोर एनआयएने नोंदवून घेतली आहे. सचिन वाझे याच्याविरुद्ध एनआयएकडून मजबूत पुरावे आणि साक्षीदार गोळा करीत आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्या प्रकरणी एमआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक केली आहे. सचिन वाझे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून तळोजा तुरुंगात त्याला ठेवण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या सीआययु मध्ये तत्कालीन प्रभारी अधिकारी असताना वाझे वापरत असलेले सरकारी वाहनावर चालक असलेल्या पोलीस चालकाकडे एनआयएने या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. घटनेच्या दिवसापासून किंवा त्यापूर्वी सचिन वाझे पोलीस वाहनातून कुठे कुठे गेला होता याबाबत पोलीस चालकाकडे चौकशी करण्यात आली असून त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

या पोलीस चालकाला या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात आले असून सचिन वाझे याच्या विरोधात भक्कम पुरावे तयार करण्यात येत आहे. मंगळवारी या पोलीस चालकाची किल्ला न्यायालयात न्यायाधीश यांच्यासमोर साक्ष नोंदवण्यात आली असल्याची माहिती एनआयए सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -