घर ठाणे राज्यात 11 जागांवर मनसे उमेदवार देणार- आमदार राजू पाटील

राज्यात 11 जागांवर मनसे उमेदवार देणार- आमदार राजू पाटील

Subscribe

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात 11 जागा लढविण्याच्या विचारात असून भिवंडी व कल्याण येथेही लोकसभे करता उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. पालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्याशी रिंग रूट आणि इतर नागरी समस्यांबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत यावेळी व्यक्त केले.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना राज्यातील लोकसभेच्या 48 जागेपैकी अकरा जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली. यामध्ये भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदार संघात संघटना अधिक बलशाही बनविण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविल्याची माहिती देत आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपावर टीकास्त्र सोडत आमदार राजू पाटील यांनी भाजपाला कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जागर यात्रा काढायची असल्यास त्यांनी ती जरूर काढावी, मात्र काही अडचण असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधून फक्त गाजर यात्रा काढू नये असा चिमटा देखील यावेळी काढला.

- Advertisement -

इंडिया आघाडीत मनसे नाही
देशभरात भाजपा विरोधात विविध राजकीय पक्ष एकत्र येत इंडिया आघाडीचे संघटन बांधले असून या संघटन आघाडीत मनसे नसल्याचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -