घरमुंबईस्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे

स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे

Subscribe

महापालिका शाळांमधील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना साहसी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणारे स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना साहसी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणारे स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवले जाणार आहे. साहसी खेळ प्रकल्पाची मजबूती टिकवण्यासाठी तसेच दिर्घकाळासाठी साहसी खेळ प्रकल्प महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार आहे.

कंत्रादाराची नेमणूक 

भांडूप येथील पवई हायलेव्हल फिल्टरपाडा येथे स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे साहसी खेळ प्रकल्प उभारण्याबाबत क्षेत्र संघटक तथा जिल्हा चिटणीस स्काऊट-गाईड विभागाने यांत्रिकी व विद्युत विभागामार्फत करण्यास मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार याठिकाणी साहसी खेळ प्रकल्पाचा पुरवठा, उभारणी, चाचणी व कार्यान्वित करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी स्टार इलेक्ट्रीक या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांना ९० लाखांचे कंत्राट देण्यात येत आहे.

- Advertisement -

आर्थिक बचतीसाठी प्रकल्पाचे काम

प्रकल्प उभारण्यासाठी बांबू, वासे, काथ्या, दोर्‍या इत्यादी साहित्य भरपूर प्रमाणावर लागते. तसेच प्रकल्प उभारण्यासाठी मनुष्यबळही अधिक लागते. परंतु पावसाळ्यात हा प्रकल्प खोलून ठेवण्यात येत असल्याने एकदा वापरलेले साहित्य खराब होवून जाते. परिणामी ते पुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नवीन साहित्य खरेदी करावे लागते. त्याकरता दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असतो. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचत करण्यासाठी, मनुष्यबळ वाचवण्यासाठी, तसेच साहसी खेळ प्रकल्प मजबूत करण्यासाठी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्राद्वारे साहसी खेळाचे आयोजन

स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्रात मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकरता वर्षभरात विविध उपक्रम, साहसी खेळ व निवासी शिबीरे आयोजित केली जातात. या शिबीरांमध्ये मोकळ्या वातावरणातील शिक्षणाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व, धाडस, चौकसबुध्दी, उत्तम निरीक्षण, आकलन, स्मरणशक्ती, काटकपणा, राकटपणा, स्वावलंबन, आत्मविश्वास, शौर्य, विश्वाससार्हता इत्यादी सद्गुण अंगी राबवण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाकरता स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्राद्वारे साहसी खेळाचे आयोजन केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -