घरमहाराष्ट्रबेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

Subscribe

भावनिक तसेच अस्मितेच्या मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या या मोदी सरकारने नवीन नोकऱ्या, उद्योग यांच्या वाढीसाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

बेजोरगारीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये गुरुवारी राष्ट्रवादी युवक एम्पलॉयमेंट ऑफिसला टाळे ठोकणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग आणि नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस येत्या गुरुवारी एम्पलॉयमेंट ऑफिसला टाळे ठोकणार आहे. गुरुवारी दुपारी ११ वाजता रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला टाळे ठोकणार आहे.

उच्चशिक्षण घेऊनही लाखो तरुणांना नोकरीसाठी भटकावे लागत आहे. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळातच बेरोजगारीचा दर ६.१% झाला आहे. भावनिक तसेच अस्मितेच्या मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या या मोदी सरकारने नवीन नोकऱ्या, उद्योग यांच्या वाढीसाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या ५ वर्षात देशभरातील दोन कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. या सर्व परिस्थितीकडे सोईस्करपणे कानाडोळा करणाऱ्या या सरकारला जागे करण्याची गरज आहे. निवेदन देऊन या सरकारला जाग येत नसेल तर निष्क्रिय सरकारच्या कार्यालयाला टाळेच ठोकले पाहिजे. कामच नसेल तर कार्यलय कशाला चालवायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. या टाळा ठोको आंदोलनाला अधिकाधिक युवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष राकेश कामठे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -