घरमुंबईसीएसएमटी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 'सात'वर

सीएसएमटी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा ‘सात’वर

Subscribe

नंदा कदम यांचा मृत्यू हृदयात रक्ताची गुठळी होऊन कार्डियॅक अरेस्ट आल्यामुळे झाला असल्याचं हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे.

मुंबईतील सीएसएमटी स्टेशनला जोडणारा हिमालय पादचारी पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आज आखणी एकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा सातवर गेला आहे. ५७ वर्षीय नंदा कदम असं या महिलेचा नाव असून त्या सीएसएमटी पूल दूर्घटनेत जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना वाशीच्या एमजीए हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचारांना प्रतिसाद ही देत होत्या. पण, अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नंदा कदम यांचा मृत्यू हृदयात रक्ताची गुठळी होऊन कार्डियॅक अरेस्ट आल्यामुळे झाला असल्याचं हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. त्यांचा मृतदेह नवी मुंबईतून साताऱ्याला त्यांच्या मूळगावी नेण्यात आल्याचं ही नंदा कदम यांच्या पतीचे मित्र विश्वनाथ सावंत यांनी सांगितलं. १४ मार्च २०१९ ला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळ असणारा पादचारी पूलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका महिलेचा बुधवारी मृत्यू झालाय. जवळपास महिनाभर या महिलेवर नवी मुंबईतील वाशीच्या एमजीएम रूग्णालयात उपचार सुरु होते. पण, बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

नंदा कदम यांच्या पतीचे मित्र विश्वनाथ सावंत यांनी सांगितलं की, ” दूर्घटनेनंतर नंदा कदम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पायाला लागले होते त्यामुळे, शस्त्रक्रिया देखील केली होती. पण, डॉक्टरांनी अचानक त्यांच्या हृदयात गुठळ्या झाल्याचं सांगितलं. त्यांना व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आलं पण, त्यांचा सकाळी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह साताऱ्याला नेण्यात आला. ”

- Advertisement -

मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ असणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग १४ मार्च संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. यामध्ये सहा जण मृत्यूमुखी पडले होते. आता ही संख्या वाढली असून मृतांचा आकडा सातवर गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -