घरमुंबईलग्नाच्या आमिषाने 28 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार

लग्नाच्या आमिषाने 28 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार

Subscribe

घर विकून पळलेल्या प्रियकराला सात वर्षांनी अटक

लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. आरोपी लग्नाची वेळ जवळ येताच घर विकून पळून गेला, सात वर्षांनी ओशिवरा पोलिसांनी विरार येथून अटक केली. विशेष म्हणजे या प्रियकराने दुसर्‍या तरुणीशी विवाह केला असून त्याला एक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेश चंद्रकांत काडगे असे या 34 वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत तरुणी ही 28 वर्षांची असून ती जोगेश्वरी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. नववीत असताना तिची त्याच परिसरात राहणार्‍या गणेश काडगे याच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही एकाच परिसरातील तसेच गावचे रहिवाशी असल्याने त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. याच दरम्यान ते दोघेही जोगेश्वरीतील 24 कॅरेट सिनेमागृहात एक सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. तिथेच त्याने तिच्याशी जबदस्तीने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला होता. चौदा वर्षांपूर्वी तिने गणेशसोबतच लग्न करणार असल्याचे तिच्या कुटुंबियांना सांगितले होते. मात्र घरच्यांनी तिला विरोध केला होता. यादरम्यान ते दोघे बोरिवली येथे भेटत होते. त्याने तिला एका लॉजमध्ये नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

- Advertisement -

सोन्याची चैनही पळवली
2011 साली त्याने घरातील बांधकामावर प्रचंड खर्च झाल्याचे सांगून तिच्याकडून 25 हजार रुपये आणि एक सोन्याची चैन घेतली होती. ही चैन आणि कॅश दहा दिवसात परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही महिने उलटूनही त्याने ही रक्कम आणि चैन परत केली नाही. त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. यावेळी तो घर विकून दुसरीकडे राहण्यासाठी गेल्याचे तिला समजले. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. दोन वर्षांपूर्वी गणेशच्या मित्राने तिला गणेशविषयी माहिती दिली. तो सध्या विरार येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर ती त्याच्या विरार येथील वीर सावरकर मार्गावरील गणपती मंदिराजवळील नारंगी फाटा, साईराम अपार्टमेंटमधील घरी गेली.

आरोपीकडून क्षमायाचना
पीडित तरुणीला आरोपी गणेशचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा असल्याचे समजले. त्याच्याकडून फसवणूक झाल्याने तिने त्याला जाब विचारला. मात्र त्याने माफी मागून तिचे पैसे आणि चैन देण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगून तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गणेशविरुद्ध बलात्कार, लैंगिक अत्याचार, अपहार, विनयभंगासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात रविवारी सकाळी त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडी असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -