घरमुंबईनग्नावस्थेत व्हिडीओ कॉलद्वारे महिलेशी अश्लील संभाषण

नग्नावस्थेत व्हिडीओ कॉलद्वारे महिलेशी अश्लील संभाषण

Subscribe

18 वर्षांच्या तरुणाला अटक

नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल करून एका महिलेशी अश्लील संभाषण करणार्‍या 18 वर्षांच्या तरुणाला सोमवारी एमआयडीसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. संजीतकुमार फुलसागर असे या तरुणाचे नाव असून ठाणे येथील घोडबंदरचा हा रहिवाशी आहे. त्याला मंगळवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक केदार पवार यांनी सांगितले.

तक्रारदार महिला ही अंधेरीतील एमआयडीसी परिसरात राहते. 30 सप्टेंबर रोजी पीडित महिला तिच्या पतीसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने तिथे उपस्थित पोलिसांकडे एका तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. हा तरुण तिला मोबाईलवरून अश्लील मॅसेज पाठवत होता, मात्र तो परिचित नसल्याने तिने त्याला उत्तर दिले नव्हते. त्यानंतर या तरुणाने तिला व्हॉट्अ‍ॅप कॉल केले होते. त्यावेळी हा तरुण पूर्णपणे नग्नावस्थेत होता. त्यानंतर तिने लगेच तो कॉल बंद केला होता. स्वत:चे अश्लील फोटो व्हॉट्अ‍ॅपवर पाठवून तिचा विनयभंगही केला.

- Advertisement -

या घटनेची पोलीस उपायुक्त नवीनचंद रेड्डी यांनी गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याला तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अकलनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली केदार पवार, श्रीनिवास कामुनी व अन्य पोलीस पथकाने या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच संजीतकुमार फुलसागर याला ठाण्यातील घोरबंदर रोड परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

चौकशीत तो मोबाईल एका रिक्षाचालकाचा असून त्याच्याकडून तो मोबाईल गहाळ झाला होता. हा मोबाईल संजीतकुमारला सापडला होता. त्याने त्याच्या सिमकार्डवरुन काहींना फोन केला होता, त्यात तक्रारदार महिलेचा समावेश होता. त्याने तिला अश्लील मॅसेज आणि फोटो पाठविले होते. तसेच नग्नावस्थेत असताना तिला व्हॉट्अ‍ॅप कॉल केले होते. अटकेनंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -