घरमुंबईShelar On Thackeray : भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; शेलारांचा...

Shelar On Thackeray : भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर…; शेलारांचा ठाकरेंना टोला

Subscribe

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गंगापूर येथील पंचायत समिती मैदानावर सोमवार (12 फेब्रुवारी) जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली.

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधीलच असं भाकित केलं होतं. त्यांच्या या टीकेचा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भाजपाची घौडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या! असा खोचक सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. (Shelar On Thackeray If you get stomach ache after seeing BJPs horse race Shelars challenge to Thackeray)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गंगापूर येथील पंचायत समिती मैदानावर सोमवार (12 फेब्रुवारी) जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, गंगापूर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोनगावकर उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai News: मुंबईतील बेघर मुलांच्या शिक्षणासाठी सुरू होणार ‘सिग्नल शाळा’

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अशोक चव्हाण यांचं मला आश्चर्य वाटतं. कालपर्यंत जागावाटपामध्ये भाग घेत होते. पण आज असं अचानक काय घडलं? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की, त्यांना राज्सभेची जागा देत आहेत. तर कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला. तर भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल असे भाकीत केले त्यांनी केलं. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बाहेरुन शिवसेनेत आलेल्या नेत्यांची यादी जाहीर करत उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

हेही वाचा : Rajya Sabha Election: भाजप अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार; काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता

काय म्हणाले आशिष शेलार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार शेलार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, मूळ शिवसैनिक नसलेल्या बाहेरून आलेल्या संजय राऊत यांना घेऊन ज्यांनी आपल्या पक्षाचे “राष्ट्रवादी” केले.

उलटे सूर्य नमस्कार घालणाऱ्या भास्कर जाधव यांना घेऊन पक्षाच्या दुर्दैवाचे दशावतार केले. बाहेरून आलेल्या सुषमा अंधारेंना घेऊन आपल्या पक्षाची “समाजवादी सेना” केली. बाहेरून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना घेऊन आपल्या पक्षाला “पेज थ्री” केले. बाहेरून आलेल्या आदेश बांदेकर यांना घेऊन आपल्या पक्षाचा “होम मिनिस्टर शो” केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे काय होईल, आमचे अध्यक्ष कोण होईल याची चिंता करु नये, भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या! जंतापासून मुक्त, सशक्त राजकीय भविष्य? अशा शब्दांत शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -