घरताज्या घडामोडीKapil Dev : कपिल देव झाले महाराष्ट्राचे शेतकरी: मुंबई जवळ 'या' किंमतीत...

Kapil Dev : कपिल देव झाले महाराष्ट्राचे शेतकरी: मुंबई जवळ ‘या’ किंमतीत घेतली 16 एकर शेतजमीन

Subscribe

मुंबई – भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव आता महाराष्ट्रात शेती करणार आहेत. भारताच्या या महान खेळाडूने महाराष्ट्रात शेती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कपिल देव यांनी मुंबई जवळील कर्जत शिवारात 16 एकर शेत जमीन विकत घेतली आहे. कोट्यवधी रुपयांमध्ये त्यांनी ही शेती विकत घेतली आहे. कपिल देव आता या शेतात कोणतं पिक घेणार याची सर्वांना उत्सूकता आहे.

अनेक सेलिब्रिटी हे महाराष्ट्रात शेती करत आहेत. त्यामध्ये धर्मेंद्र, नाना पाटेकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अभिनेता संजय मिश्रा यानेही नुकतीच महाराष्ट्रात पुण्याजवळ शेती घेतली आणि तो फार्म हाऊमध्येच राहण्याला पसंती देत आहे. क्रिकेटचा देव ज्यांना म्हटले जाते असे कपिल देव हे मुळचे पंजाबातील. देशात हरितक्रांतीची सुरुवात पंजाबातून झाली. असे असले तरी कपिल देव यांनी शेतीसाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. बरेच दिवस गुप्त ठेवण्यात आलेला कपिल देव यांच्या शेत जमीन खरेदीचा व्यवहार उघड झाला आहे.

- Advertisement -

कपिल देव यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील मोग्रज गावात 16 एकर जमीन खरेदी केली. आठ कोटींमध्ये त्यांनी हा जमीन व्यवहार केला. यासाठी एक कोटी तीन लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. या जमीनीजवळच प्रसिद्ध सोलनपाडा धबधबा आहे. या धबधब्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. कपिल देव यांनी तुळशीराम गायकर यांच्याकडून ही शेतजमीन विकत घेतली आहे. प्रभारी सहनिबंधक मंगेश चौधरी यांच्या देखरेखीत हा व्यवहार झाला आहे. यापूर्वी 2022 मध्ये कोथिंबे गावात कपिल देव यांनी 25 एकर जमीन विकत घेतली होती.

कपिल देव महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करुन तिथे कशाची शेती करणार आहे, याची सर्वांनाच उत्सूकता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IND Vs AUS U19 : ऑस्ट्रेलियनच पुन्हा जगज्जेते; अंतिम सामन्यात भारताचा पराभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -