घरमुंबईघरगुती सिलेंडरला चिप बसवण्याची शिवसेनेच्या आमदाराची मागणी

घरगुती सिलेंडरला चिप बसवण्याची शिवसेनेच्या आमदाराची मागणी

Subscribe

तुमच्या घरी येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरला जर चिप बसवली तर…आता तुम्ही म्हणाल घरगुती सिलेंडरला चिप आणि ती कशासाठी? पण शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी ही मागणी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली. आज सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून सिलेंडरच्या होणाऱ्या चोरीच्या विषयावर बोलताना सांगितले. सुनील प्रभू यांनी सांगितले की, गँस एजन्सीतून गॅस बाटला ग्राहकांच्या घरी पोहोचेपर्यंतच्या वेळात चोरी करणारी टोळी आहे आणि याची माहिती गँस एजन्सी मालकाला नसते त्यामुळे हे प्रकार थांबवायचे असतील तर गॅस बाटल्याला चिप बसवली तर चोरी होणार नाही.

सुनील प्रभू नेमकं काय म्हणालेत

खरतर गॅस ग्राहकाला बाटल्याचे वजन करुन देण्यात आले पाहिजे. पण तसे होत नाही त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे सांगत आत्तापर्यंत नऊ जणांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. पण जर यासाठी बाटल्यामधे चिप बसवली तर चोरी होणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच घरोघरी पाईप गॅस ही संकल्पना चांगली आहे. पण झोपडपट्टी भागाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन याची पुर्तता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गॅसचोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाऊ शकते, असे सांगत चोरांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

पंचवटीत सिलिंडरमधून गॅसचोरी, चार डिलिव्हरी बॉय रंगेहात ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -