घरमुंबईबाजारातून औषधी ग्लिसरीन गायब

बाजारातून औषधी ग्लिसरीन गायब

Subscribe

औषध दर नियंत्रण आदेश विभागाच्या नियमाखाली आणल्याने ग्लिसरीन तोटा होत असल्याने उत्पादक ग्लिसरीनचे उत्पादन करण्यास तयार नाहीत.

राज्यातील औषधांच्या बाजारातून औषधी ग्लिसरीन (आयपी) गायब झाले असून उपलब्ध ग्लिसरीनच्या अति वापरामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाच्या घटकांमधील ग्लिसरीन आवश्यक असूनही त्याची सध्या उपलब्धता नाही. दर नियंत्रण आदेश विभागाने नियमाखाली आणल्याने याच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादनच थांबले आहे. या ग्लिसरीन आयपीच्या पर्यायासाठी इतर ग्लिसरीनचा वापर केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ग्लिसरीनच्या उत्पादन खर्चाहून दर कमी

बाजारात दोन प्रकारचे ग्लिसरीन उपलब्ध आहे. एक तोंडावाटे पोटात घेण्यास औषध रूपाने वापरतात. यावर ग्लिसरीन आयपी असं लिहिलेलं असतं. तर, दुसरं ग्लिसरीन बाह्यत्वचेवर वापरलं जात असून नॉन मेडिसीन असं लिहलेलं असतं. यापैकी सध्या औषधी ग्लिसरीन सध्या बाजारात उपलब्ध नाही. २१ जानेवारी १९८६ या कालावधीत जे. जे. हॉस्पिटलमध्ये ग्लिसरीनमुळे १४ रूग्णांचा मृत्यू झाला होता. तरीही, औषध विभागाकडून आयपी ग्लिसरीनचा दर्जा तपासण्यात आलेला नाही. औषध परीक्षणाची टक्केवारी १ एवढी असल्याचे तक्रारदार सांगतात. ग्लिसरीन आयपी आणि पोटॅशिअम परमॅग्नेट ही दोन्ही औषधे औषध दर नियंत्रण आदेश विभागाच्या नियमाखाली आणल्याने यांचा दर निश्चित कण्यात आला. त्यामुळे, याची निर्मिती करुनही त्यांचा दर उत्पादन खर्चाहून कमी आहे. यामुळे, उत्पादक याचे उत्पादन करण्यास तयार नाहीत. यातून हा तुटवडा जाणवत आहे. याचवेळी आयपी ग्लिसरीन व्यतिरिक्त ग्लिसरीन बाजारात उपलब्ध आहे. पण, हे ग्लिसरीन शरीरात गेल्यास धोका संभवू शकतो, असंही सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांनो सावधान! बाहेरचे खाद्यपदार्थ ठरतील घातक

सौंदर्य प्रसाधनांमधील ग्लिसरीन आरोग्यास घातक

देशात ग्लिसरीनचे ४० उत्पादक मुंबई उल्हासनगर, इंदोर, सांगली, नागपूर आदी शहरांमध्ये पसरलेले आहेत. याबाबत औषध उत्पादक खुल्या मुखाने बोलत नसून त्याबाबतच्या तक्रारी मात्र करताना आढळतात. याविषयी ऑल फूड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी आक्षेप घेतला आहे. ”कोणत्याही औषध निरीक्षकाने त्यांच्या कार्यक्षेत्रात २४ तासांच्या आत ग्लिसरीन आयपी शोधून देईल त्याला १० हजाराचे रोख बक्षीस देण्यात येईल, असं आवाहन पांडे यांनी केलं आहे. पण, ग्लिसरीन नसल्याने सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणारे ग्लिसरीन वापरलं गेल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते,” असंही पांडे सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -