घरमुंबईसुट्टीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल

सुट्टीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल

Subscribe

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेने आज २ डिसेंबर रोजी सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून यादरम्यान लोकल उशिराने धावणार आहेत.

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याकारणाने या दिवशी अनेक प्रवासी मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडे फिरायला जातात. मात्र या सुट्टीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल होणार आहे. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्सगावर सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. मस्जिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हा जुना पूल पाडून तिथे नवीन पूल बांधला जाणार असल्याकारणाने आज सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या मार्गावर एकही लोकल धावणार नाही

मस्जिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्याचे काम हाती घेतले असल्याने सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या कालावधीमध्ये मस्जिद ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा स्थानकापर्यंत एकही लोकल धावणार नाही. तसेच भायखळा ते सीएसएसटीपर्यंत सर्व धीम्या गतीच्या लोकल जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. या बदलांमुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार असून लाखो प्रवाशांना अडचणींना आणि गर्दीस सामोरे जावे लागणार आहे. इतर नियमित ब्लॉकपेक्षा या ब्लॉकचे स्वरुप वेगळे असल्याने गाड्यांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे.

- Advertisement -

बेस्टकडून जादा गाड्यांचे नियोजन

या कालावधीत प्रवाशांचे हाल पाहून बेस्टकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनातर्फे परिस्थिती पाहून जादा बसफेऱ्या चालवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमाच्या नियमित फेऱ्या फोर्ट., सीएसएमटी, कुलाबा ते राणी लक्ष्मीबाई मार्ग लक्ष्मीबाई चौक किंवा सायन, वडाळा चर्च आदि मार्गांवर बस फेऱ्या चालवतात. मात्र रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे बेस्टने जादा गाड्या सोडल्या आहेत.

विशेष बस फेऱ्या

  • २१ मर्यादित बस – ट्रॉम्बे – दादर – परळ – लालबाग – भायखळा – भेंडीबाजार – महात्मा फुले मार्केट – कुलाबा
  • सी ११ – सायन – धारावी – दादर – लालबाग – कुलाबा – नेव्हीनगर
  • २५ मर्यादित – सायन – माटुंगा – भेंडीबाजार – मंत्रालय – बॅकबे डेपो
  • १९ मर्यादित – शिवाजीनगर डेपो – गोवंडी – चेंबूर – लालबाग – भायखळा – भेडींबाजार – फोर्ट – मंत्रालय
  • ७ मर्यादित, ८ मर्यादित आणि २२ मर्यादित मरोळ – कुर्ला – सायन – दादर – परळ – भायखळा – इलेक्ट्रिक हाऊस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -