घरमुंबईघाटकोपर फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला होणार

घाटकोपर फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला होणार

Subscribe

मुंबईच्या दिशेची वाहतूक कोंडी फुटणार

पूर्व द्रुतगती मार्गावरील फ्लायओव्हर हा लवकरत वाहतुकीस खुला होणार असल्याचे संकेत आहेत. या फ्लायओव्हरचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या फ्लायओव्हरचे काम रखडल्याने ही जागा वाहतुक कोंडीसाठी कारणीभूत ठरत होती. आता फ्लायओव्हर खुला होणार असल्याने या भागातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मदत होईल. सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हे काम सुरू आहे. नियोजित वेळेपेक्षा हा फ्लायओव्हर अनेक कारणांमुळे रखडला आहे. पण जास्त गर्दीच्या वेळेत हा टप्पा पार करण्यासाठी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईच्या दिशेने जाताना सकाळच्या वेळेत वाहन चालकांना रोज मोठ्या वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. विक्रोळी ते घाटकोपर असा साधारणपणे १० मिनिटांत करता येणारा प्रवास हा त्यामुळेच किमान अर्धा ते पाऊण तासांचा होत आहे. पण फ्लायओव्हरची दुसरी बाजू म्हणजे मुंबईच्या दिशेची बाजू सुरू झाल्यास मात्र मोठा दिलासा मिळेल असे अपेक्षित आहे. त्यामुळे घाटकोपर येथे होणारी वाहतुकीची रोजची कोंडी फुटेल. सध्या घाटकोपरला होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे विक्रोळीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. या रांगांमुळे प्रवासाचा रोजचा वेळ वाढत आहे. ” आम्ही फ्लायओव्हरचे काम वेगाने करतो आहोत, ज्यावेळी आम्हाला पाऊस नसलेला दिवस मिळेल तेव्हा आम्ही हे मास्टिंगचे म्हणजे फ्लायओव्हरच्या रस्त्याला डांबर लावण्याचे काम पुर्ण करू. त्यानंतर लगेचच या फ्लायओव्हरवरून वाहतुकीला सुरूवात होईल अशी माहिती एमएमआरडीएचे प्रवक्त बी जी पवार यांनी दिली. यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या फ्लायओव्हरच्या वरच्या बाजुचे काम पुर्ण झाले आहे. तर फ्लायओव्हरच्या खालच्या बाजुला रंगाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फ्लायओव्हरची बाकीची कामे पुर्ण झाले आहेत. त्यामुळे फ्लायओव्हरमुळे अतिरिक्त असे दोन लनचे ट्रॅफिक सुरू होणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणाची वाहतूक कोंडी फुटणे शक्य होईल. तसेच वाहन चालकांचा वेळही वाचेल असे त्यांनी सांगितले.


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -