घरताज्या घडामोडीमहिलांनो लोकल सुरू झाली; या वेळेत प्रवास करण्यास मिळाली परवानगी

महिलांनो लोकल सुरू झाली; या वेळेत प्रवास करण्यास मिळाली परवानगी

Subscribe

मुंबईकर महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून मुंबईकर महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वेकडून परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान महिलांना लोकल प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नसणार आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान आणि सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.’

- Advertisement -

दरम्यान राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी शुक्रवारी दिली होती. सरकारने त्याबाबतचे पत्रकही प्रसिद्ध केले होते. पण महिलांसाठी त्वरित लोकल चालवण्यास रेल्वे मंत्रालयाकडून असमर्थता दर्शवण्यात आली. इतक्या कमी कालावधीत महिला प्रवाशांसाठी लोकल सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वेमार्फत स्पष्ट करण्यात आले. लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍यांमध्ये एक संयुक्त बैठक घेणे गरजेचे आहे, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले होते. पण आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उद्यापासून महिलांना लोकल प्रवास करण्याची मुभा असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रेल्वे आणि राज्य सरकारच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -