घरमुंबईआज मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन

आज मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन

Subscribe

राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरुवात

राज्य मंत्रिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बुधवारी मुंबईत पार पडणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनास सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बुधवारी पार पडणार्‍या या विशेष अधिवेशनात लोकसभा व विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत पुढील दहा वर्षांसाठी वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकाला समर्थन देणारा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येवून मंजूर केला जाणार जाणार आहे.

केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी कलेले घटना दुरूस्ती विधेयक संमत केले आहे. संविधानातील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत समर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यास मंत्री परिषद बैठकीत ठरले होते.त्यानुसार एकदिवसीय अधिवेशन उद्या बुधवारी होत असून,कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या कामकाजानुसार विशेष अधिवेशनात सकाळी ११ वाजता विधानमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.त्यानंतर नुकत्याच करण्यात आलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा परिचय करून दिला जाईल.अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर,राज्यसभा सचिवालयाकडून संविधान विधेयक २०१९ यासह संविधानातील सुधारणेच्या अनुसमर्थनार्थ प्राप्त झालेला संदेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर या विधेयकाच्या समर्थनाबाबत ठराव मांडण्यात येवून तो मंजूर केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -