घरमुंबईआज दहावीचा निकाल

आज दहावीचा निकाल

Subscribe

दुपारी १ वाजल्यापासून संकेतस्थळावर निकाल दिसणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निकाल दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. राज्यातून तब्बल 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी तर मुंबईतून तीन लाख 60 हजार 78 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या असताना अखेर शुक्रवारी बोर्डाकडून दहावीचा निकाल 8 जूनला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. बोर्डाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून तब्बल 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी, तर मुंबईतून तीन लाख 60 हजार 78 विद्यार्थी बसले आहेत. तर मुंबईतून पुर्नपरिक्षार्थींची संख्या 16 हजार 360 असून, विशेष विद्यार्थी दोन हजार 691 इतकी होती. मुंबईमध्ये ही परीक्षा 999 केंद्रांवर घेण्यात आली. दहावीचा निकाल www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठीचा अर्जाचा नमूना संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुुणपडताळणीसाठीचा अर्ज 10 ते 19 जूनपर्यंत तर छायांकित प्रतीसाठीचा अर्ज 10 ते 29 जूनपर्यंत शुल्कासह भरता येणार आहे. छायांकीत प्रत मिळाल्यानंतर पुढील पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुण सुधारण्यासाठी लगतच्या दोन परीक्षांमध्ये म्हणजेच जुलै-ऑगस्ट 2019 व मार्च 2020 अशा दोन संधी मिळणार आहेत.

एसएमएसद्वारे मिळणार निकाल
दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेस्थळावर पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आपला निकाल मोबाईल एसएमएसवरही उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHSSDspace><seat no.> अशापद्धतीने टाईप करून 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे. मेसेजे पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांना बोर्डाकडून त्यांचा निकाल मेसेजवर पाठवण्यात येणार आहे.

- Advertisement -

या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल
www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -