घरदेश-विदेशStock Market : शेअर बाजारात 'बबल'; सेबीनंतर आता आरबीआयकडूनही चिंता व्यक्त

Stock Market : शेअर बाजारात ‘बबल’; सेबीनंतर आता आरबीआयकडूनही चिंता व्यक्त

Subscribe

नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) नंतर आता केंद्रीय रिझर्व्ह बँकेने शेअर बाजारातील स्मॉल आणि मिडकॅप समभागांच्या ‘बबल’वर चिंता व्यक्त केली आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनीही काही दिवसांपूर्वी मिड आणि स्मॉल कॅप्सच्या ‘बबल’वर चिंता व्यक्त केली होती. यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अशातच आता रिझर्व्ह बँकेने आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले की, वेळोवेळी सुधारणा करूनही शेअर बाजारात वाढ सुरूच आहे. लार्ज कॅप्स वाढत आहेत, पण मिड आणि स्मॉल-कॅप्स अधिक वेगाने वाढत आहेत. (Stock Market Bubble in the stock market After SEBI now RBI also expressed concern)

हेही वाचा – Bacchu Kadu : आम्ही आमचा झटका दाखवू आणि वेळ पडल्यास…; बच्चू कडूंचा महायुतीविरोधात शड्डू

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, भारतीय इक्विटीमधील एफपीआय स्टेक 16.3 टक्क्यांच्या दशकाच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे, जो म्युच्युअल फंडांसह देशांतर्गत संस्थांकडून वाढलेली खरेदी दर्शवतो. रिझर्व्ह बँकेच्या मते, रुपया सर्वात कमी अस्थिर चलनांपैकी एक आहे आणि तो सतत वाढत आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत थेट परकीय गुंतवणुकीत वार्षिक 11.4 टक्के वाढ झाल्यामुळे भारतीय रुपया मजबूत झाला आहे. जागतिक बाँड निर्देशांकांमध्ये भारतीय सार्वभौम रोख्यांचा समावेश केल्यामुळे ऑफशोअर रुपी-डिनोमिनेटेड बाँड्सची मागणी वाढली आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे बाजारातील ‘बबल’वर, सेबीने स्मॉलकॅप आणि मिडकॅप गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्याचे संकेत दिले होते.

सेबीकडून ‘बबल’बाबत चिंता व्यक्त

अलीकडेच, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले होते की, बाजार नियामकाला एसएमई श्रेणीतील शेअरच्या किमतींमध्ये हेराफेरीचे संकेत मिळाले आहेत. हेराफेरी केवळ आयपीओमध्येच नाही तर सर्वसाधारणपणे शेअर्सच्या खरेदी-विक्रीमध्येही होत आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून चुकीचे आढळल्यास, सल्ला जारी केला जाऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – Sushma Andhare : …हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने उगवलेला सूड, अंधारेंचे शरसंधान

म्युच्युअल फंड संस्थेचे परिपत्रक

म्युच्युअल फंड उद्योग संस्था असोसिएशन फॉर म्युच्युअल फंड (AMFI) ने सेबीकडून प्राप्त झालेल्या ईमेलवर आधारित एक परिपत्रक 27 फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. AMFIK नुसार, सेबीने सल्ला दिला आहे की, स्मॉल आणि मिडकॅप समभागातील वाढ पाहता, म्युच्युअल फंडांनी या योजनांमधील गुंतवणूकदारांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी धोरण तयार करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -