घरमुंबईउल्हासनगरमध्ये मनपा कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

उल्हासनगरमध्ये मनपा कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

दीपक कनोजिया याने आज दुपारच्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या दालनात पेट्रोल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

उल्हासनगर मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दीपक कनोजिया याने आज दुपारच्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या दालनात पेट्रोल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मनपा कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी बाळासाहेब नेटके यांनी कनोजियाला रुग्णवाहिकेमध्ये बसवून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे.

…म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

दीपक कनोजिया हा सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला. नंतर त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याने आपणास चतुर्थ श्रेणीतुन तृतीय श्रेणीत सामावून घ्यावे, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने त्याला निवडणूक व अन्य कामे सोपवली आहेत. दिपकचे म्हणणे आहे की, ज्या दिवसापासून त्याला नियुक्त केले आहे. त्या दिवसापासून तृतीय श्रेणीचा पगार देण्यात यावा, यासाठी तो वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याने रागाच्या भरात आज मनपा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या दालनात पेट्रोल प्राशन केले. देहरकर यांनी तातडीने सुरक्षा रक्षकांना बोलावून कनोजिया याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील बाटलीत आणलेलं पेट्रोल ताब्यात घेतलं. मनपा कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी बाळासाहेब नेटके यांनी कनोजियाला रुग्णवाहिकेमध्ये बसवून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे.

- Advertisement -

गेल्या २ वर्षांपासून दीपक कनोजिया पदोन्नती व पगारवाढ संदर्भात पाठपुरावा करीत आहे. मात्र त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेवटी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार दुर्दैवी आहे. मनपाचे सामान्य प्रशासन मधील अधिकारी हे कामगारांचे शोषण करीत असून त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई झाली पाहिजे.
दिलीप थोरात (महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष, उल्हासनगर)

सदर कर्मचारी हा नियमबाह्य पद्धतीने वेतनवाढ मागत होता. हे शक्य नसल्याने तो चतुर्थ श्रेणी मधून तृतीय श्रेणीमध्ये आला आहे. जेव्हापासून तो तृतीय श्रेणीत आला. तेव्हापासून त्याला वेतनवाढ लागू होईल. मात्र तो बॅक डेटेड पासून वेतनवाढ मागत आहे. या कर्मचाऱ्याने पेट्रोल आणले कसे? सुरक्षा रक्षक काय करीत होते? याबाबत आम्ही चौकशी करीत आहोत.
संतोष देहरकर, (मनपा उपायुक्त)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -