घरमहाराष्ट्रराज्यातील ग्रामीण भागात वाढतेय उच्च रक्तदाबाची समस्या

राज्यातील ग्रामीण भागात वाढतेय उच्च रक्तदाबाची समस्या

Subscribe

ग्रामीण भागात १३ तर, शहरात १२ टक्के उच्च रक्तदाबाचे प्रमाण

शहरातील नागरिकांची बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढलेले असताना आता राज्यातील ग्रामीण भागातील लोकांमध्येही विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे मधुमेह, डोकेदुखी, हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब हे आजार बळावत असताना दुसरीकडे उच्च रक्तदाबाची समस्या वाढली आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेनुसार, शहरांपेक्षा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागत १३ टक्के उच्च रक्तदाबाचे प्रमाण आढळले आहे. तर, शहरात १२ टक्के प्रमाण आढळले असून हा आकडा भीतीदायक असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट आहे.


हेही वाचा – ‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता

- Advertisement -

भारतात १५ ते ४९ या वयोगटातील ११ टक्के लोक हायपरटेंशनने ग्रस्त

हायपरटेंशन एक सायलेंट किलर म्हणजे हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. ज्याचा परिणाम हृदय, किडनी आणि शरीरातील इतर अवयवांवर होतो. रक्तात जास्त प्रमाणात कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हा आजार जडतो. १५ ते ४९ या वयोगटातील भारतातील ११ टक्के लोक हायपरटेंशनने ग्रस्त आहेत. हा अहवाल ब्रिटीश मेडिकल जनरलने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात देण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. तसंच, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयींमुळे, दारुच्या व्यसनामुळे, वाढलेल्या तणावामुळे ही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, हायपरटेंशनची सुरुवात होण्यावर लवकरात लवकर निदान आणि योग्य उपचार झाले नाही तर हा आजार पुढे बळावण्याची ही शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.


हेही वाचा – आरोग्यास डिंकाचे लाडू खाणं ठरेल फायदेशीर

- Advertisement -

हायपरटेंशनवर योग्य उपचार घेतले तर यातून होणाऱ्या मृत्यूंवरही नियंत्रण मिळवता येऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा २०२५ पर्यंत हायपरटेंशनचे प्रमाण कमी करण्याचा मानस आहे. त्यामुळे, संसर्गजन्य आजारांच्या उपचारांसोबत असंसर्गजन्य आजारांवरही उपचार करणे तितकेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हायपरटेंशन न होण्यासाठी ‘हे’ करा

बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे हा आजार बळावला आहे. त्यामुळे लोकांनी कामाचा ताण, अतिकाळजी आणि त्यातून जडणार्‍या व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -