घरमुंबईमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

Subscribe

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या दिवशी रेल्वे प्रशासन रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर आणि बऱ्याच गोष्टींचा देखभाल करण्यासाठी मेगाब्लॉक ठेवत असतो. आज रेल्वेने तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. परंतु, सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या मेगाब्लॉकचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

सुट्टीच्या दिवसानिमित्ताने रेल्वे रुळांची देखभाल आणि इतर अनेक कामांसाठी मुंबई आणि उपनगरच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वेच्या मरिन लाइन्स ते माहिम, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे असा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान, पावसाळा आणि रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने बरेच तरुण धबधबा आणि नदी परिसरात जात आहेत. कुणी मुंबईच्या दिशेने मरिन ड्राइव्हला येथ आहे तर कुणी कर्जत, भिवपूरीला जात आहे. आज सकाळपासूनच फिरायला जाणाऱ्या विविध मित्रांचा गृप ट्रेनमध्ये दिसत आहे. सुट्टीनिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या या तरुणांना कदाचित मेगाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता असणार आहे.

‘या’ स्थानकांदरम्यान असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे या मार्गावर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी ११.२० ते ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे कल्याण ते ठाणे दरम्यानच्या जलद गाड्या धिम्या मार्गाकडे वळवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहिम स्थानकांदरम्यान विरारच्या दिशेला जाणाऱ्या धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. दरम्यान, या गाड्यांना महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रेल्वे स्थानकांवर थांबा असेल. सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच पनवेल ते अंधेरी देखील गाड्या धावणार नाहीत. ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत पनवेल ते ठाणे आणि सकाळी ११.१४ ते ३.२० पर्यंत ठाणे ते पनवेल गाड्या धावणार नाहीत. सकाळी ११ ते ३.३२ बेलापूर ते खारकोपर आणि ११.३० ते ४ वाजेपर्यंत खारकोपवरुन सुटणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाणे ते वाशी आणि नेरुळ लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात काँग्रेसची नवी स्टाईल; थोरात प्रदेशाध्यक्ष, तर पहिल्यांदाच नेमले कार्याध्यक्ष!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -