घरमुंबईदुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट घ्या

दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट घ्या

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना

मुंबई : राज्य मंत्रिपरिषदेच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी महिनाभरात दुष्काळ जाहीर करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचे पालक आणि संपर्क मंत्र्यांना दुष्काळाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यासाठी मंत्रिपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आढाव्याच्या दृष्टीने मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या.

राज्यात विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील २०० तालुक्यांना दुष्काळाच्या झळा पाहोचू लागल्या आहेत. पावसाळा संपत नाही तोच टंचाई सुरू झाली आहे. यावेळचा पाऊस लवकरच गायब झाल्याने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर विशेष जबाबदारी टाकून त्यांना आढावा घेण्यास सांगितले आहे. पालकमंत्री आणि संपर्क मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये दौरे करून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दुष्काळग्रस्त म्हणून प्राप्त झालेल्या तालुक्यांमध्ये सरासरी ७५ टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे.दुष्काळी परिस्थितीबाबत मंत्रिपरिषदेत मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. दुष्काळ जाहीर करण्यासाठी ३१ आक्टोबरची डेडलाईन देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दुष्काळ नियंत्रण नियमावलीनुसार दुष्काळग्रस्त विभागाची पाहणी केली जाणार आहे. त्याआधी परिस्थितीचा आढाव घेतला जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

तालुक्यांचा आढावा घेत त्या आधारे केंद्रीय समितीच्या पाहणीनंतर दुष्काळ जाहीर करता येतो. हे लक्षात घेऊन दुष्काळाची तंतोतंत माहिती, आणेवारीची स्थिती आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था याची माहिती तातडीने प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -