घरमुंबईघिसाडघाईमुळे शिवस्मारक भूमिपूजनाला सुरूंग

घिसाडघाईमुळे शिवस्मारक भूमिपूजनाला सुरूंग

Subscribe

मुंबई:- युती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिवस्मारक प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्घटनेने एकूणच समितीच्या कारभारावर टीकेचे माहोळ उटले आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणारे आणि कंत्राटदारांना वर्कऑर्डर देणारे अधिकारी आणि स्मारक समितीतील वाढत्या विसंवादाने हा कार्यक्रम घिसाघाईत योजला गेला. अधिकारी आणि समिती पदाधिकार्‍यांतील वादाचा परिणाम म्हणजे कालचा स्मारक क्षेत्रात झालेला अपघात मानला जात आहे. हा कार्यक्रम इतक्या घाईत करू नये, असे मत तांत्रिक मान्यता देणार्‍या अधिकार्‍यांचे होते. पण अधिकार्‍यांवर विश्वासच नसल्याने समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी हा कार्यक्रम घिसाडघाईने आयोजल्याचे सांगितले जात आहे.

स्मारक समिती आणि अधिकार्‍यांमधील विसंवादामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम अचानक योजण्यात आला. यात अधिकारी स्मारक समितीला फारशी किंमत देत नसल्यामुळे समितीने घाईत हा कार्यक्रम योजल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाला पर्यावरणाच्या परवानग्या देण्यात आल्या असल्या तरी सीआरझेडबाबत अजूनही काही परवानग्या यायच्या आहेत. असे असताना इतक्या घाईत कार्यक्रम ठेवू नये, अशी सूचना काही अधिकार्‍यांनी केली होती. पण मात्र यात अधिकारी मेख मारत असल्याचे निमित्त करत कार्यक्रम योजला गेला. यातच स्मारकाचे काम निवडणुकीआधी सुरू व्हायला हवे, अशी घाई समितीला आणि सरकारला होती. यातूनच कार्यक्रमाचे आयोजन घाईत करण्यात आले आणि भूमिपूजनाआधीच या कार्यक्रमाला आपत्तीने गाठले.

- Advertisement -

स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी योजण्यात आला होता. या भूमीपूजन स्थळी संबंधित विभागाचे अधिकारी, कंत्राटदार लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनी, समितीचे पदाधिकारी पत्रकारांसह स्पीडबोटीने जातअसताना एक स्पीडबोट स्मारक परिसरातील दगडावर आदळून पाण्यात बुडाली. या अपघातात सिध्देश पवार हा कोल्हापूर येथील तरुण मृत्यूमुखी पडला. हा प्रकार केवळ समितीच्या दुर्लक्षेपायीच झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जी बोट दगडावर आदळली त्या बोटीत १८ जण प्रवास करत होते, अशी माहिती पुढे आली आहे. इतके प्रवाशी या बोटीत कसेकाय बसू शकले, हा एक प्रश्नच आहे. ज्या ठिकाणी स्मारक उभारायचे आहे, तिथे मोठ्याप्रमाणावर खडक असल्याने तिथे प्रवाशी बोट नेणे अशक्य असल्याचे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी अनेकदा सूचित केले होते. असे असतानाही फायबरबेस बोट स्मारकच्या परिसरात नेण्यात आलीच कशी, असे विचारले जात आहे.

विशेष म्हणजे या परिसरात बोट नेणे शक्य नाही, असे ससून डॉक आणि बंदरकर मच्छिमारनगरमधील मासेमारांनी अनेकदा सांगूनही त्यांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बंदरकर मच्छीमारनगरमधील मच्छिंद कोळी यांनी या प्रतिनिधीला सांगितले. स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अचानक का योजण्यात आला याविषयी अपघातानंतर कोणीही बोलायला तयार नाही. स्मारक परिसर दगडांचा असल्याने तिथे केवळ भरतीवेळीच जायला हवे, अशी अपेक्षा असताना याठिकाणी तीन वाजता जाण्याचे कारण काय, अशी विचारणा होते आहे. बुधवारी समुद्रातील मोठी भरती ही ११.३१ वाजता होती. भरतीचे प्रमाण तेव्हा ४.१७ मीटर इतके होते. अपघात झाला तेव्हा समुद्राला ओहोटी होती. ओहोटीवेळी केवळ अडीच मीटर इतके पाणी असताना खडकात बोट चालवणे आपत्तीला निमंत्रण देणारे होते. असे असताना साडेतीन वाजता बोट तिथे नेण्यात का आली, असे विचारले जात आहे.

- Advertisement -

निवडणुकांसाठी श्रेयाची लढाई

स्मारक समिती आणि अधिकार्‍यांमधील विसंवादामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम अचानक योजण्यात आला. यात अधिकारी स्मारक समितीला फारशी किंमत देत नसल्यामुळे समितीने घाईत हा कार्यक्रम योजल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाला पर्यावरणाच्या परवानग्या देण्यात आल्या असल्या तरी सीआरझेडबाबत अजूनही काही परवानग्या यायच्या आहेत. असे असताना इतक्या घाईत कार्यक्रम ठेवू नये, अशी सूचना काही अधिकार्‍यांनी केली होती. पण यामागेही अधिकारी मेख मारतील, अशी शक्यता समितीच्या प्रमुखांना होती. यातच स्मारकाचे काम निवडणुकीआधी सुरू व्हायला हवे, अशी घाई समितीला आणि सरकारला होती. यातूनच कार्यक्रमाचे आयोजन घाईत योजण्यात आले आणि भूमिपूजनाआधीच आपत्तीने गाठले.

मेटेंवर गुन्हा दाखल करा

शिवस्मारकाच्या भूमीपूजनावेळी झालेल्या अपघाताला स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे कारणीभूत आहेत, असा आरोप करत मेटे यांच्याविरोधी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल मच्छिमार समितीचे प्रमुख दामोदर तांडेल यांनी केली आहे. हा कार्यक्रम जणू विनायक मेटेच्या शिवसंग्राम पक्षाचाच होता असा थाट रचून सार्‍या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे.

आमचे कोळी बांधव ज्या परिसरात मासेमारीही करू शकत नाहीत, तिथे हे स्मारक उभारण्याचा प्रयत्न म्हणजे आगीबरोबर खेळण्याचा प्रकार आहे, असे तांडेल यांनी ‘महानगर’शी बोलताना स्पष्ट केले. खडकातून जाणे हे बोटीच्या अपघाताला निमंत्रण होय. असे असतानाही प्रकल्प याच ठिकाणी का घेण्यात आला, असा सवाल तांडेल यांनी केला आहे. या अपघाताला सर्वस्वी विनायक मेटेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी कोळी बांधवाची मागणी आहे. आम्ही या विरोधात गुरुवारी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहोत, असे तांडेल यांनी स्पष्ट केले.

हा सरकारी कार्यक्रम नव्हता, असेच दिसते. कारण या कार्यक्रमात मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भरणा होता. मेटेंनी या कार्यक्रमातून पब्लिक स्टंन्ट करून राजकीय फायदा उपटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणीही तांडेल यांनी केली आहे.

सिध्देशच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

शिवस्मारकाच्या भूमिपूजनस्थळी बोट बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या सिध्देश पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची मेरीटाईम बोर्डामार्फत चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कोल्हापूरस्थित सिध्देश पवार हा चार्टर्ड अकाऊंटन्ट असून, तो मामाबरोबर शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी मुंबईत आला होता. दुर्घटनेतील बोटीत तो स्मारकाकडे जात असताना बोटीला भगदाड पडले आणि तिला जमसमाधी मिळाली. यात सिध्देश बुडून मरण पावला.

शिवस्मारकाच्या निविदेत गोलमाल

युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या अरबी समुद्रात उभारायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक प्रकल्प वादात अडकण्याची शक्यता आहे. स्मारकाच्या बेकायदेशीर काम आणि असंख्य चुकांच्या जांजाळात शिवस्मारकाच्या निविदेतही घालमेल करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या दस्तरखुद्द विनायक मेटे यांनी केला आहे. यासंदर्भातील गोपनीय पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. मेटेंच्या या पत्राने स्मारक उभारणीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची बाब पुढे आली आहे.

ज्यांच्या हाती या कामाची जबाबदारी आहे, त्या अधिकार्‍यांनी या कामात भयानक चुका केल्या आहेतच पण अनियमितपणामुळे हा प्रकल्प वादात अडकू शकतो, असे नमूद करत मेटे यांनी ज्या झारीतल्या शुक्राचार्यांनी हे केले आहे, त्याची सखोल चौकशी करा अशी सूचना आपल्या पत्रात केली आहे. हे होणार नसल्यास आपल्याला हक्कभंग मांडावा लागेल, असा इशाराही मेटे यांनी या पत्रात दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -