घरमुंबईअपहरणाच्या भीतीने भरधाव गाडीमधून मुलीने मारली उडी

अपहरणाच्या भीतीने भरधाव गाडीमधून मुलीने मारली उडी

Subscribe

हे अपहरण नाट्य सोमवारी (दि.१८) नाशिक-शिर्डी मार्गावरील वावी ते पिंपरवाडी (ता.सिन्नर) येथे भर दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान घडले.

शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींना लिफ्ट देण्याचा बहाणा करुन पिकअपचालकाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गाडी घराजवळ आली तरी चालक थांबवत नसल्याने एका मुलीने आपला जीव मुठीत धरत रस्त्यावर उडी मारली. मुलींचा मदतीसाठी आवाज ऐकू आल्याने दुचाकीवरुन कुटुंबियांनी गाडीचा पाठलाग सुरु केला असता पिकअपचालक दुसर्‍या मुलीला रस्त्याच्या कडेला सोडत फरार झाला. हे अपहरण नाट्य सोमवारी (दि.१८) नाशिक-शिर्डी मार्गावरील वावी ते पिंपरवाडी (ता.सिन्नर) येथे भर दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान घडले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माधुरी काळू ब्राम्हणे (१४, रा. वावी, ता.सिन्नर) असे जखमी मुलीचे नाव आहे.

अशी घडली घटना

पिंपरवाडी शिवार येथून माधुरी आणि तिची चुलत बहीण कोमल बाळासाहेब ब्राम्हणे या दोघी आज सोमवारी दि. १८ रोजी सकाळी परीक्षेसाठी वावी येथील नूतन महाविद्यालयात आल्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर दोघीजणी नेहमीप्रमाणे शिर्डी राज्यमार्गावर आल्या. घरी जाण्यासाठी त्यांनी शिर्डी महामार्गावरून पाथरेच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना हात केला. यावेळी रस्त्याने जाणार्‍या एका पिकअपचालकाने तुमच्या घराजवळ सोडतो, असे सांगून दोघींना पाठीमागे बसायला सांगितले. मात्र, दोघींनी सांगितलेल्या ठिकाणी पिकअप वाहन न थांबवता चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवली. दोघीजणी पिकअपच्या पाठीमागे बसल्या. घराजवळ पिकअप आली असता माधुरीने चालकाला पिकअप थांबवण्यास सांगितली. मात्र, चालकाने भरधाव वेगाने पिकअप चालवत राहिला. त्यातून दोघींचे अपहरण झाले असल्याचे समजून दोघीही घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज मार्गलगत उभे असलेल्या कुटुंबियांना आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवरुन पिकअपचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी माधुरीने पिकअपमधून रस्त्यावर उडी मारली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. ४ किलोमीटर अंतरावर मिरगाव फाट्याजवळ पिकअप आली असता चालकाने कोमलला रस्त्यालगत सोडून भरधाव वेगाने निघून गेला. दुचाकीवरुन आलेल्या कुटुंबियांनी तिला घरी आणले. जखमी झालेल्या माधुरीला उपचारासाठी कुटुंबियांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. घटनेबाबत वावी पोलीस ठाणे व महाविद्यालयाकडे चौकशी केली असता सोमवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल कुठलीही माहिती नसल्याने सांगण्यात आले. रुग्णालयातून प्रथम माहिती अहवाल आल्यावर रात्री उशिरा वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ब्राम्हणे कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेबद्दल माहिती घेतली व एका सहकार्‍याला नाशिकला रुग्णालयात रवाना केले. शाळेतील शिक्षकांनीदेखील रात्री उशिरा घरी जाऊन विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -