घरमुंबईसरकारने 62 खेळाडूंना नोकर्‍या दिल्या

सरकारने 62 खेळाडूंना नोकर्‍या दिल्या

Subscribe

22 व्या आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे तावडेंच्या हस्ते उद्घाटन

खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य आणि देशपातळीवर खेळात प्रावीण्य संपादन करणार्‍या 62 खेळाडूंना सरकारने नोकर्‍या दिल्या आहेत, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ढिसाळ कारभारामुळे दोन दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या 22 व्या आंतररविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अखेर विनोद तावडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

खेळाडूंनी देशपातळीवर नावलौकीक मिळवावा यासाठी वातावरण निर्मितीची गरज असून राज्यात खेळसंस्कृती रुजली पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खेळात सहभागी विद्यार्थ्यांना विशेष गुण दिले जात आहेत. त्याचबरोबर राज्य आणि देशपातळीवर खेळणार्‍यांना नोकरीत 5 टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. राज्य आणि देशपातळीवर खेळात प्राविण्य संपादन केलेल्या 62 खेळाडूंना शासनाने नोकर्‍या दिल्या आहेत. खेळ संस्कृती रुजविण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने स्पोर्ट्स सायन्स सेंटर्सची निर्मिती करावी. जेणेकरून स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स सायकॉलॉजी अशा घटकांना चालना मिळेल. विद्यापीठांतर्फे उत्कृष्ट खेळाडू राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविले जाऊ शकतात असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महोत्सवात राज्यातील 20 अकृषी आणि कृषी विद्यापीठातील 1978 खेळाडूंसह 264 प्रशिक्षक आणि व्यवस्थापक सहभागी झाली आहेत. परंतु विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका खेळाडू, प्रशिक्षकांना पहिल्या दिवसांपासून बसला आहे. खेळाडूंच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून त्यांनी सहभाग घेतलेल्या खेळांसाठी त्यांना एका कॉलेजमधून दुसर्‍या कॉलेजमध्ये धावपळ करावी लागत आहे.

- Advertisement -

क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. मृणालिनी फडणवीस, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो.रवींद्र कुलकर्णी, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक कुमार मुकादम, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, क्रीडा संचालक डॉ. उत्तम केंद्रे, यांच्यासह राज्यपाल नियुक्त निरीक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात प्रावीण्यप्राविण्य संपादन करुन विद्यापीठाचे नाव उंचावले आहे. खेळात हरणे-किंवा जिंकणे हे ओघाने येतच असते मात्र त्याचबरोबर अपयशाचा सामना करण्याची क्षमता निर्माण होणे हेही तितकेच गरजेचे आहे.
– प्रो. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -