घरमुंबईगोरेगाव उड्डाणपुलावर खिलाडूवृत्तीचे दर्शन

गोरेगाव उड्डाणपुलावर खिलाडूवृत्तीचे दर्शन

Subscribe

पुलाच्या दुभाजकांवर क्रीडा प्रकारातील खेळाडुंच्या प्रतिकृती

मुंबई महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या जोगेश्वरी (उत्तर ) उड्डाणपूल अर्थात मृणालताई गोरे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर, आता या पुलावर खिलाडूवृत्तीचे दर्शन घडू लागले आहे. रस्त्यांच्या तसेच पुलांच्या दुभाजकांवर जिथे झाडांची रोपे लावून सुशोभित केले जातात, तिथे या गोरेगावच्या पुलावरील दुभाजकांवर प्रत्येक क्रीडा प्रकाराचे दर्शन घडवले आहे. क्रिकेटपासून ते सर्वच खेळाप्रकारातील खेळाडुंच्या प्रतिकृती या पुलावरील दुभाजकांवर साकारण्यात आल्याने या पुलांच्या सौंदर्यात भर पडली आहे.
जागेश्वरीतील उत्तर दिशेला बांधण्यात आलेल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला. स्वामी विवेकानंद मार्गावरून (एस.व्ही.मार्ग) पश्चिम रेल्वेचा पूल ओलांडून पश्चिम द्रुतगती महामार्गाला हा  पूल जोडला जातो. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर आता या पुलाच्या दुभाजकांवर सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांतील खेळाडुंच्या प्रतिकृती साकारल्या गेल्या आहेत. खेळाडुंच्या या प्रतिकृतींचे अनावरण रविवारी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी पी/दक्षिणचे प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल, माजी नगरसेवक दिलीप पटेल आदी उपस्थित होते. बॅटमिंटन,  बॉक्सिंग, क्रिकेटमधील फलंदाज, गोलंदाज, फुटबॉल, हॉकी, टेनिस, बास्केटबॉल, धावपटू, गोल्फ, सायकलिंग आदी क्रिडाप्रकारातील खेळाडुंच्या प्रतिकृती या दुभाजकांवर साकारल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्यावतीने वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणाची कामे हाती घेतली जातात. त्या सुशोभिकरणाचाच हा भाग असल्याचे पी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी स्पष्ट केले. पी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांनीही समाधान व्यक्त करत सुशोभिकरणातून क्रिडा प्रकाराला प्राधान्य दिल्याने त्यांनी महापालिका कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -