घरमुंबईनितेश राणेंच्या खळखट्याकला मनसेचा पाठिंबा

नितेश राणेंच्या खळखट्याकला मनसेचा पाठिंबा

Subscribe

रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला उपस्थित

उपअभियंत्यावर चिलखफेक केल्या प्रकरणी नारायण राणे यांचे पूत्र आणि आमदार नितेश राणे यांच्यावर टीका होत असताना मनसेने मात्र त्यांची बाजू घेतली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नितेश राणे यांची बाजू घेत नितेश राणे यांनी जे केले ते योग्यच असल्याचे संदीप देशपांडे म्हणालेत. एवढच नाही तर रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत संदीप देशपांडे?

नितेश राणे यांना अटक झाली. त्यांना चार ते पाच दिवसांची पोलिस कोठडी झाली. ज्या इंजिनिअरमुळे हजारो लोकांचे बेळी गेले त्या इंजिनिअर्सवर सरकार कारवाई कधी करणार? जे इंजिनिअर आज आंदोलन करत आहेत त्यांची जबाबदारी नाही का? एवढे लाखोंचे पगार घेता पण रस्ते निट करत नाहीत मग लोकप्रतिनिधींनी कुणाला जाब विचारायला हवा असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. चांगल्या भाषेत जर अधिकांर्यांना समजत नसेल तर त्यांना तिच भाषा वापरावी लागेल असे म्हणत त्यांनी नितेश राणेंनी जे केले ते योग्य असल्याचे म्हटले आहे. एवढंच नाही तर नितेश राणे यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

रोखठोक भूमिका

नितेश राणेंचा उद्रेक योग्यच आहे, त्याच्या या भूमिकेचे मी समर्थन करतो. कारण प्रत्येक वेळी जनतेला तिकडच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशावेळी एकदा अधिकाऱ्याला त्रास झाला तर काय चुकीचे आहे, असे मला  वाटते. 

बबन साळगावकर (सावंतवाडी नगराध्यक्ष ) 

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण 

मुंबई गोवा महामार्ग येथे रस्त्यावरील खड्यावरून नितेश राणे आक्रमक झाले होते आणि त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना ९ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -