घरमुंबईसाडेसहा कोटी रुपयांचे आणखीन रक्तचंदनाचा साठा जप्त

साडेसहा कोटी रुपयांचे आणखीन रक्तचंदनाचा साठा जप्त

Subscribe

कुर्ला येथील गोदामात आंबोली पोलिसांचा छापा, रक्तचंदन दुबईसह चीनला तस्करीमार्गे पाठविण्याचा कट उघड

भारतात बंदी असलेल्या रक्तचंदनाच्या आणखीन मोठा साठा शुक्रवारी आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने कुर्ला येथून जप्त केला आहे. एका गोदामात ठेवण्यात आलेल्या 22 बॉक्समधून पोलिसांनी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी आंबोली पोलिसांनी दोन तरुणांना अटक करुन त्यांच्याकडून अडीच कोटी रुपयांचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला होता. या दोन्ही कारवाईत आता पोलिसांनी 1 किलो 845 किलोचा रक्तचंदन जप्त केले असून त्याची किंमत सुमारे सव्वानऊ कोटी रुपये असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले.

हा साठा दुबईसह चीनला तस्करीमार्गे पाठविण्यात येणार होता. विदेशात रक्तचंदनाला प्रचंड मागणी असल्याने भारतात मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची तस्करी केली जाते. अशाच रक्तचंदनाचा एक साठा कार्गोमार्गे दुबईला जाणार आहे, हा साठा घेऊन काहीजण अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती आंबोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दया नायक, कापसे व अन्य पोलीस पथकाने वन परिमंडळ अधिकार्‍यांनी विरा देसाई रोडवरील शामनगर मैदानाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

- Advertisement -

अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
गुरुवारी तिथे आलेल्या टेम्पोतील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. टेम्पोची झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्यात रक्तचंदनाचा साठा सापडला, या रक्तचंदनाची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये होती. टेम्पोचालक सनी हॅरीसन फ्रॉन्सिसच्या चौकशीतून इजाज फतेह सय्यद आणि सुफियान इरफान शेख या दोघांची नावे समोर आली. त्यानंतर या दोघांनाही या पथकाने डोंगरी परिसरातून अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी एका मिनी टेम्पोसह नऊ प्लास्टिकच्या सफेद रंगाच्या पिशवीमध्ये पॅकिंग केलेले 500 किलो 465 ग्रॅम वजनाचे रक्तचंदनाचे ओंडके, साडेपाच हजार रुपयांची कॅश कॅश/क्रेडिट मेमो असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांच्या चौकशीत कुर्ला येथे आणखीन रक्तचंदनाचा साठा लपविण्यात आला असून तो लवकरच चीनला पाठविण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती.

२२ बॉक्समध्ये होता साठा
या माहितीनंतर राजेंद्र चव्हाण, भारत गायकवाड व त्यांच्या पथकातील दया नायक, सचिन कापसे, राणे, जमादार, बोमटे, चव्हाण, पवार, साळवी, सचिन राणे, फाटक, पाटील, रेवणकर यांनी कुर्ला येथील एका गोदामात छापा टाकला होता. या गोदामातून पोलिसांनी 22 बॉक्समध्ये ठेवलेला रक्तचंदनाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेसहा कोटी रुपये आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून आणखीन काही धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -