घरमुंबईशेतकऱ्यांना मदत हीच राष्ट्रवादीची भूमिका - जयंत पाटील

शेतकऱ्यांना मदत हीच राष्ट्रवादीची भूमिका – जयंत पाटील

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे’, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. या बैठकीसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटले, जयंत पाटील, सुनील तटकरे हे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – आम्ही विरोधी बाकावरच बसू – अजित पवार

- Advertisement -

शेतकऱ्यांना तातडीची मदत हीच राष्ट्रवादीची भूमिका – जयंत पाटील

‘आज अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालच पवार साहेब नाशिक दौरा करुन आले. आम्ही देखील आपापल्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघून आलो. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज पवार साहेबांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलावले होते. मी या पूर्वीच इथे येण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करुन त्याचा साधारणपणाने ढोबळमानाने अहवाल उद्यापर्यंत त्यांनी पक्ष कार्यालयापर्यंत पाठवावा आणि हा अहवाल एकत्रित करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने एक-दोन दिवसांत राज्यपालांना भेटून महाराष्ट्रात या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीन कोणती आणि कशाप्रकारे केंद्र सरकार मदत करु शकते, यांची माहिती आम्ही देणार आहोत’, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -