घरमुंबईआपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीचे आज प्रकाशन

आपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीचे आज प्रकाशन

Subscribe

ठाण्‍याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड आणि महापौर नरेश म्‍हस्‍के यांची उपस्‍थिती

खणखणीत बातम्या आणि रोखठोक भूमिकेमुळे मुंबई आणि नाशिककरांचा विश्वास संपादन करणारे दैनिक ‘आपलं महानगर’ वर्तमानपत्राचे ठाण्याच्या माध्यम विश्वात पदार्पण होत आहे. शुक्रवार ३१ जानेवारी २०२० रोजी आपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीचे ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रकाशन होणार आहे. नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होणार आहे.

आपलं महानगर ठाणे आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त या दिवशी सकाळी १० वाजता ‘आव्हानांचं ठाणं’ हा विशेष परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात राज्य सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. आपलं महानगरच्या या वैविध्यपूर्ण ठाणे आवृत्तीमध्ये ठाणे शहर आणि जिल्ह्यासह, नवी मुंबई, पालघर, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या, लेख, घटना, घडामोडींच्या माहितीसह निर्भीड निष्पक्ष पत्रकारितेतून ठाण्याची नव्याने ओळख वाचकांना होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून आपलं महानगर वर्तमानपत्राच्या या सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी विनंती आपलं महानगरचे संपादक संजय सावंत आणि कार्यकारी संपादक संजय परब यांनी केली आहे.यावेळी पत्रकारिता, साहित्य, राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

‘आपल्या बातम्या….आतल्या बातम्या’ ही टॅगलाईन घेऊन आलेल्या आपलं महानगरने गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळातील अनेक ‘आतल्या बातम्या’ समोर आणून शोध पत्रकारितेचा आपला वसा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. परिणामी राज्याच्या राजकीय परिघात आपलं महानगर रोज आवर्जून वाचला जातो. हाच दबदबा सामाजिक क्षेत्रातही आपलं महानगरने कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे संपादकीय भूमिकेतूनही विविध विषयांवर आपले थेट मत वाचकांपर्यंत नेताना आपली स्पष्ट भूमिका वेळोवेळी दाखवून दिली आहे. रविवारच्या ‘सारांश’ पुरवणीतही विविध विषयांचे मत-मतांतर हे आपलं महानगरचे वैशिष्ठ्य राहिले आहे. हे सारे आता ‘आपलं महानगर’ ठाणे वाचकांसाठी घेऊन येत आहे. बातम्यांच्या पलिकडची दुनिया दाखवताना त्यावरची निष्पक्ष भूमिका मांडली जात असल्याने वाचकांना एका वेगळ्या अनुभूतीचा आनंद मिळेल, असा विश्वास आपलं महानगरने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -