घरमुंबईदुर्गंधीमुळे मुंबईकरांना आता नाल्यांचाही होवू लागला त्रास

दुर्गंधीमुळे मुंबईकरांना आता नाल्यांचाही होवू लागला त्रास

Subscribe

मुंबईतील अनेक नाले हे अनधिकृत झोपड्यांनी बुजवून त्यावर घरे बांधली आहेत. मात्र, ज्या नाल्यांचा गळा घोटून बांधलेल्या घरांमध्येच आता पावसाळ्यात पाणी तुंबू लागले आहे. तसेच आसपासच्या नाल्यांमधील कचर्‍यासह गाळांमुळे दुर्गंधी पसरत असल्याने आता याच लोकांना नाले नकोसे वाटू लागले आहे. नाल्यातील दुर्गंधीमुळे आता हे नालेच बंदिस्त करण्याची मागणी होवू लागली असून त्यासाठी आता महापालिकेने पॉलिकार्बोनेट शीटद्वारे बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

उघड्या नाल्यांमध्ये वारंवार कचरा व इतर वस्तू टाकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नाल्यांमध्ये कचरा आणि पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नाल्यातील या कचरा आणि गाळामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी हा परिसर दुर्गंधीमुक्त करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. त्यामुळे आता महापालिकेने मुंबईतील पॉलिकार्बोनेट शिटद्वारे बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

यापूर्वी कांदिवली,मालाड येथील नाले प्रायोगिक तत्वावर बंद केल्यानंतर आता जुहू वर्सोवा लिंक रोडवरील कल्व्हर्ट ते एन.दत्ता मार्ग कल्व्हर्टपर्यंतच्या अभिषेक नाल्यावरही पॉलिकार्बोनेट शीटद्वारे बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिवाजीनगर २ ते मांगलेवाडीपर्यंतच्या मेघवाडी नाल्याच्या झोपडपट्टीच्या बाजूला तारेचे कुंपण लावण्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.

हा नाला ५९५ मीटर लांबीचा असून त्यावर पॉलिकार्बोनेट शीटसह तारेचे कुंपण बांधण्यासाठी सुर्या एंटरप्रायझेस या कंपनी निवड करून त्यावर सव्वा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -