घरमुंबईपश्चिम रेल्वेवर रात्री विशेष ब्लॉक, 'या' गाड्या झाल्या रद्द

पश्चिम रेल्वेवर रात्री विशेष ब्लॉक, ‘या’ गाड्या झाल्या रद्द

Subscribe

पश्चिम रेल्वेवर माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर गर्डर बसविण्यासाठी १० जानेवारीच्या मध्यरात्री आणि ११ जानेवारीच्या मध्यरात्री धीम्या व जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने धावणार आहेत. मध्यरात्री १२.०० ते पहाटे ५.३० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसा ब्लॉक नसेल. याशिवाय चर्चगेटहून शेवटची लोकल मध्यरात्री १२.५० वाजता सुटणार आहे.
पश्चिम रेल्वेवर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात एकूण १८ स्लो लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४ फास्ट लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

या लोकल झाल्या रद्द

चर्चगेट ते वांद्रे-रा.११.०६, चर्चगेट ते अंधेरी- म.रा १२.३१, चर्चगेट ते बोरीवली- म.रा १.००, वांद्रे ते बोरीवली- प. ४.५७, वांद्रे ते बोरीवली- प.५.२०, महालक्ष्मी ते बोरीवली- प ५.०६, वांद्रे ते बोरीवली-प.५.३५, वांद्रे ते बोरीवली- स.६.११, दादर ते विरार- प.५.२०, चर्चगेट ते गोरेगाव- प.५.१५, अंधेरी ते चर्चगेट- प.४.०४ , बोरीवली ते चर्चगेट-प.३.५०, बोरीवली ते चर्चगेट-प.४.०८, बोरीवली ते चर्चगेट- प.४.२३, बोरीवली ते चर्चगेट-प.४.२७, विरार ते दादर- प.४.१३, बोरीवली ते चर्चगेट- स.६.०७, बोरीवली ते चर्चगेट-स.६.२०

- Advertisement -

तर भाईंदर ते चर्चगेट- प.४.०५, विरार ते चर्चगेट-प.३.५३, भाईंदर ते चर्चगेट-प.४.३६, विरार ते चर्चगेट- प.४.२५ या फास्ट लोकल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -