घरमुंबईराऊतांच्या पोस्टने सेना घायाळ

राऊतांच्या पोस्टने सेना घायाळ

Subscribe

उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यात जसे शिवसेनेचे आमदार आहेत, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले देखील आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारच्या ‘नमनालाच घडाभर तेल’, असे काहीसे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रिमडळात स्थान दिले नसल्यामुळे ही नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, संजय राऊत यांनी नाराजी नसल्याचेच ठामपणे म्हटले आहे. पण पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय विश्लेषक या पोस्टचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सकृतदर्शनी तरी ही पोस्ट संजय राऊतांची नाराजीच व्यक्त करणारी वाटत असल्याने शिवसेनादेखील घायाळ झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी संजय राऊत शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भावाला मंत्रिपद न मिळाल्यामुळेच संजय राऊतांनी कार्यक्रमाला जाणे टाळले, अशी चर्चा होती. पण ‘मी सरकारी कार्यक्रमांना जात नाही, उद्धव ठाकरेंचा शपथविधी हा फक्त एक अपवाद होता. म्हणून या कार्यक्रमाला गेलो नाही’, असे म्हणत संजय राऊतांनी नाराजीते वृत्त फेटाळून लावले होते. त्यामुळे राऊत यांच्या नाराजीच्या चर्चा निवळत असताना नव्या वर्षाच्या सुरुवातीला, बुधवारी संजय राऊत यांनी केलेली पोस्ट पुन्हा वाद निर्माण करणारी ठरली आहे. ही पोस्ट त्यांनी उद्धव ठाकरेंनाच उद्देशून लिहिली असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो.. साथ, समय और समर्पण’, अशी पोस्ट संजय राऊतांनी कुणासाठी आणि कुणाला उद्देशून लिहिली असावी, याविषयी चर्चा सरू झाली आहे.

इतर पक्षांत ही नाराजीसत्र सुरुच
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक इच्छुकांना स्थान न देण्यात आल्याने सुरु झालेले नाराजीसत्र बुधवारीही कायम राहिले आहे. मंगळवारी काँग्रसच्या पुणे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केल्यानंतर बुधवारी तिन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी आपली खदखद व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी देखील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तर काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे हे १४ आमदार नाराज

रामदास कदम, दिवाकर रावते, भास्कर जाधव, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, तानाजी सावंत, सुनील प्रभू, सुनील राऊत, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशीष जैस्वाल, संजय रायमुलकर, संजय शिरसाट, अनिल बाबर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -