घरमुंबईवीज जोडणी परत करा, वॉर्मिंग थांबवा

वीज जोडणी परत करा, वॉर्मिंग थांबवा

Subscribe

आयआयटी प्राध्यापकाची मोहीम

पारंपरिक वीज जोडणीला पर्याय म्हणून सोलार ऊर्जेचा स्वच्छ पर्याय देण्याची मोहीम आयआयटी मुंबईतील एका प्राध्यापकाने सुरू केली आहे. जगभरातील ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते संकट पाहता या प्राध्यापकाने भारतीयांना सोलारच्या स्वच्छ ऊर्जेचा स्विकार करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ३४ जणांनी आपली वीज जोडणी बंद करण्याची इच्छा व्यक्त करत या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. एनर्जी सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक चेतन सोलंकी यांनी स्वराज फाऊंडेशनच्या माध्यमातून हा पुढाकार घेतला आहे.

पर्यावरणीय बदलांचा विळखा जगभरात घट्ट होतोय. सध्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये हवा, पाणी, माती, वने, नद्या आदींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण तयार झाले आहे. जीवाश्म इंधनांचा वापर जगभरात पर्यावरणीय बदलांचे संकट वाढवणारा आहे. म्हणूनच पर्यावरणासाठीची पहिली मदत म्हणून विजेची जोडणी बंद करण्याची शपथ घेत आहे, अशा आशयाची ही मोहीम आहे.

- Advertisement -

‘पर्यावरणीय बदलांसाठीच्या पर्यायाचा मी भाग होणार, प्रदुषणाचा नाही’, अशी ही शपथ आहे. म्हणूनच मी विजेची जोडणी परत करत १०० टक्के सोलार ऊर्जेचा पर्याय अवलंबला आहे. लोकांनी देशभरातून सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच मुंबईतून या मोहिमेत लोकांनी सहभाग नोंदवला आहे. लवकरच लोकांना आपल्या ऊर्जा वापराचे कॅलक्युलेटर संकेतस्थळावर वापरायला मिळणार आहे.

सौर ऊर्जेच्या वापरासोबतच ग्रीडच्या वीज वापराचा नेट मीटरींगचा पर्याय ग्राहकांकडे आहे. पण फक्त सोलारचा शिस्तबद्ध वापर करण्याचे आवाहन आम्ही या मोहिमेतून करत आहोत. २४ तास सौर ऊर्जेवर आधारीत वीज उपकरण वापरणे हे आव्हानाचे नसल्याचे सोलंकी यांनी सांगितले. म्हणूनच आम्ही ऊर्जा संवर्धन करणारी उपकरणे आणि सोलार पॅनेल – बॅटरी अशी उपकरणे लोकांना सोल्यूशन म्हणून देणार आहोत. त्यामध्ये लोकांची रोजची विजेची गरज भागवणे शक्य होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.

- Advertisement -

भारतातील टीअर २ आणि टीअर ३ क्रमांकाची शहरे तसेच ग्रामीण भागातून लोकांचा सहभाग या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. वीज जोडणी रद्द करण्यासाठी पहिली नोंदणी ही बिहारमधून झाली आहे. तसेच राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी ७ ते ८ घरांमध्ये हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प राबविण्यात आला होता, अशीही माहिती त्यांनी दिली.

मुंबईसारखे मेट्रो शहर आव्हानाचे

साधारणपणे अशी मोहीम स्वतःपासून सुरू करणे आवश्यक असते. मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात असे प्रकल्प राबवताना आव्हाने आहेत. चांगल्या सूर्यप्रकाशापासून ते जागेची उपलब्धतता अशा आव्हानांचा मी सामना केला आहे. पण माझ्या घरात रेफ्रिजेरेटर, मायक्रोव्हेव्ह, टेलिव्हिजन, गिझरचा वापर मी अनेक वर्षांपासूनच बंद केला आहे. सोलारच्या वापराकडे पूर्णपणे जाता आले नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -