घरमुंबईक्रीडा संचालकाबाबत मुंबई विद्यापीठ निरुत्साही

क्रीडा संचालकाबाबत मुंबई विद्यापीठ निरुत्साही

Subscribe

मुंबई विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयांमध्ये हे पद नियुक्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सरकारी अध्यादेशाला सात वर्षे उलटली तरीही विद्यापीठ क्रीडा संचालक नियुक्त करण्याबाबत निरुत्साही आहे.

स्पर्धात्मक खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये क्रीडा संचालक नेमण्याचे आदेश काढले. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या महाविद्यालयांमध्ये हे पद नियुक्त करण्यात आले. मात्र मुंबई विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयांमध्ये हे पद नियुक्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सरकारी अध्यादेशाला सात वर्षे उलटली तरीही विद्यापीठ क्रीडा संचालक नियुक्त करण्याबाबत निरुत्साही आहे.

महाविद्यालय पातळीवर खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात क्रीडा संचालक पद गरजेचे आहे. त्या अनुषंगाने २०१४ पासून सरकारने आदेश काढूनही अनुदानित महाविद्यालयांमध्ये क्रीडा संचालक पद नेमण्यास मंजुरी दिली. प्रत्येक महाविद्यालयाला क्रीडा संचालक नेमता यावा यासाठी विद्यार्थ्यांचे खेळ शुल्क १०० रुपयांवरून ४०० रुपये केले. सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये क्रीडा संचालकाची नेमणूक करण्यात आली. परंतु मुंबई विद्यापीठाने या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. २०१४ पासून सात वर्षे झाली तरी मुंबई विद्यापीठांने क्रीडा संचालक पद नियुक्त करण्याबाबत कोणताही पुढाकार घेतला नाही. परिणामी मुंबई विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न १८८ महाविद्यालयांमध्ये अद्यापही क्रीडा संचालक हे पद तयार करण्यात आले नाही. तसेच क्रीडा संचालकाची नियुक्ती करावी यासाठी विद्यापीठाने आतापर्यंत कोणताही उत्साह दाखवला नाही. याउलट विद्यार्थ्याच्या खेळ शुल्कात १०० रुपयांवरून ४०० रुपये वाढ करण्यात मात्र उत्साह दाखवला. विद्यार्थ्यांमधील खेळ नैपूण्याला वाव देण्याऐवजी क्रीडा संचालकांची नेमणूक करण्याऐवजी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. असा आरोप युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे.

- Advertisement -

शारीरिक शिक्षण पदवीधर विद्यार्थ्यांकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबून त्यांच्यातील खेळाडूला उत्तम प्रशिक्षक मिळावा यासाठी क्रीडा संचालक तातडीने नेमण्यात यावी यासाठी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि साईनाथ दुर्गे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -