घरमुंबईवाशीत पादचारी पुलाचा काही भाग कोसळला; २ जण जखमी

वाशीत पादचारी पुलाचा काही भाग कोसळला; २ जण जखमी

Subscribe

वाशी पूल दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी मुंबईतल्या वाशीमध्ये पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज ही घटना घडली आहे. वाशीच्या मिनी सी-शोअर पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यामधील एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाशीच्या सेक्टर ८ मधील सागर विहार येथे असणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला. मिनी सी-शोअर पुलाचा काही भाग कोसळून यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे कर्माचारी आणि वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य करत जखमी झालेल्या दोघांना ताबडतोब नजीकच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -