घरताज्या घडामोडीमुंबईत Vibrant Gujrat Rally : महाराष्ट्रातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठी CM Patel उद्योजकांच्या...

मुंबईत Vibrant Gujrat Rally : महाराष्ट्रातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठी CM Patel उद्योजकांच्या भेटीला

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आरोप करत असतानाच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल बुधवारी (11 ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर आहेत. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 (VGGS-2024) चे ते नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रातील आणि मुंबईतील उद्योगांना गुजरातकडे आकर्षित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने भूपेंद्र पटेल मुंबईत रोड शो देखील करणार आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग, मुंबईतील वित्तीय संस्था, कार्पोरेट ऑफिस अहमदाबाद आणि सूरतला पळवले जात असल्याचा भाजपवर आरोप होत आहे. शिवसेना ठाकरेगटापासून सर्वच विरोधक हे आरोप करत आहेत. अशातच गुजरात सरकारचा मुंबईत व्हायब्रंट गुजरात हा महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करणारा कार्यक्रम होत आहे. उद्योजक आणि उद्योगांना गुजरात कसे सोयीचे आहे, हे सांगण्यासाठी मुंबईमध्ये रोड शोचेही आयोजन करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल महाराष्ट्रातील उद्योजकांशी संवाद साधत आहेत.

- Advertisement -

बुधवारी सकाळी त्यांनी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची भेट घेतली. त्यासोबतच पी अँड जी चे एमडी ए.व्ही वैद्यनाथन यांचीही भूपेंद्र पटेल यांनी भेट घेतली आहे.


महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याची विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका होत असताना हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार विरोधांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024

व्हायब्रंट गुजरातचा पहिला कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला. याठिकाणी 1500 हून अधिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी हजेरी लावली होती. 120 हून अधिक डिप्लोमॅट्सनी उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाबद्दल जाणून घेतले. यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री पटेल मुंबईत आले आहेत. येथील ताजमहाल पॅलेस येथे हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, विमा अशा विविध सेवा क्षेत्रांना गुजरातमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित केले जाणार आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 च्या माध्यमातून गुजरातला गेटवे टू द फ्यूचर म्हणून गुजरात सरकार सादर करत आहे. या कार्यक्रमाबद्दल विरोधक आता काय भूमिका घेतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -