घरमुंबईवडाळ्यातील प्रतिपंढरपूरात विनोद तावडेंची पूजा

वडाळ्यातील प्रतिपंढरपूरात विनोद तावडेंची पूजा

Subscribe

वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पहाटे सपत्नी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरात विठ्ठल नामाचा गजर होताना दिसत आहे. तसेच अवघे पंढरपुर भक्ती सागरात तल्लीन झाले आहे. आज पहाटे पासूनच पंढरपुरातील श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी दिसून येत आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सहपत्नी श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेत शासकीय महापूजा केली. तर वडाळ्यातील प्रतिपंढरपूरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली असून सकाळपासूनच भक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील पहाटे सपत्नी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल – रखुमाईची विधीवत पूजा केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले विनोद तावडे?

श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, ‘राज्यातील जनतेला सुखी, समृद्ध आणि निरोगी ठेव. तसेच मुंबईकरांना सुखी समाधीनी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे’.


हेही वाचा – यातायाती धर्म नाही विष्णुदासा; पंढरपूरला मुस्लिम वारकऱ्यांचाही सहभाग

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना पुढच्या वर्षीही पुजेचा मान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -