घरमुंबईस्मार्ट सिटीमधून विरार-नालासोपारा वगळण्याचे पाप सत्ताधार्‍यांनी केले!

स्मार्ट सिटीमधून विरार-नालासोपारा वगळण्याचे पाप सत्ताधार्‍यांनी केले!

Subscribe

क्षितिज ठाकूर यांचा हल्लाबोल

आमदार क्षितिज ठाकूर यांनी नालासोपारा शहराच्या पूर्व व पश्चिम भागात बुधवारी जोरदार प्रचार केला. यावेळी येथील बहुतांशी नागरिकांशी संवाद साधला. हा संवाद साधताना गेल्या 10 वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आपल्या प्रत्येक भाषणात आढावा घेतला. ‘शहराचा विकास आमचा ध्यास असून पाणी, परिवहन,आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही आमची शक्ती खर्ची घातली, वेळप्रसंगी दिल्लीचे तख्तही हलवण्यास आम्ही मागे पुढे पाहिले नाही,’ याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.

या दरम्यान विरोधकांनी खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही. स्मार्ट सिटी योजनेच्या यादीतून वगळण्याचे पाप या लोकांनी केले. शासनाकडून उपलब्ध होणार्‍या आर्थिक मदतीमध्ये कपात केली. 3200 कोटींच्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 1800 कोटींवर या लोकांमुळेच आला. त्याचा परिणाम विकासकामांवर जाणवला, या पापाचे धनी असलेली मंडळी, आता तोंड वर करून विचारतात विकास का झाला नाही? याचे उत्तर आता तुम्ही मतदारांनी 21 ऑक्टोबर रोजी दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -