घरमुंबईभावे नाट्यगृह, डॉक्टर्स क्वार्टर्सचे काम ५ महिन्यात पूर्ण करा आयुक्तांचे आदेश

भावे नाट्यगृह, डॉक्टर्स क्वार्टर्सचे काम ५ महिन्यात पूर्ण करा आयुक्तांचे आदेश

Subscribe

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नुतनीकरण कामाची बारकाईने पाहणी करून नाट्यकर्मींचा आणि नाट्यरसिकांचा नाट्यगृह लवकरात लवकर सुरु होण्याविषयीचा आग्रह लक्षात घेता कामाची गुणवत्ता राखत ऑक्टोबर पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत.

वाशी सेक्टर 28 येथील ट्री बेल्टची पाहणी करून त्यांनी सूचना केल्या .तसेच जुहूगांव येथे बांधण्यात येत असलेल्या डॉक्टर क्वॉर्टर्स इमारतीची पाहणी करून हे काम आगामी चार ते पाच महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.सेक्टर 10 ए येथील आंतरक्रीडा संकुल इमारतीची पाहणी करून आसपासच्या परिसराची संकुलाला शोभेशी सुधारणा करण्यास आयुक्तांनी सांगितले. सेक्टर 10 ए मिनी सिशोअर येथील जॉगींग ट्रॅकच्या वॉक वे ला बसविण्यात येत असलेल्या एस.एस.रेलींगच्या कामाची पाहणी करताना वॉक वे अधिक चांगल्या पध्दतीने विकसित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.सेक्टर 8 ए येथील पावसाळी पाणी उदंचन केंद्राची बारकाईने पाहणी करत सदर इमारतीची पूर्नबांधणी करणेबाबत त्यांनी निर्देशित केले.

- Advertisement -

सेक्टर 8 ए येथील सनसेट पॉईंट गॅलरीच्या वास्तुची पाहणी करताना या वास्तूचे व वॉक वे चे काम उत्तम प्रतीचे व्हावे याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला विशेषत्वाने सूचित केले.सेक्टर 3 ए वाशी येथील बहुउद्देशीय इमारतीच्या कामाची पाहणी करून सदर इमारतीचे काम वेळेत पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर त्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -