घरमुंबईशहराचे रक्षणकर्ते रात्रभर पाण्यात

शहराचे रक्षणकर्ते रात्रभर पाण्यात

Subscribe

पोलीस ठाण्यांत शिरले पाणी

सोमवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलीस ठाण्यात साचलेल्या पाण्यातही पोलीस अधिकारी कर्मचारी आपली कामगिरी चोखपणे बजावताना दिसत होते. काही पोलीस ठाण्यात तर चक्क टेबलावर बसून काम करीत होते. तसेच दिवसभराची आपले कर्तव्य बजावून घरी जाण्यासाठी निघालेल्या पोलिसांना रेल्वे वाहतूक तसेच रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यामुळे रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागली आहे. मुंबईतील वाकोला, खेरवाडी, नेहरू नगर, पार्कसाइड, साकीनाका, भायखळा, सायन आणि माटुंगा, कस्तुरबा मार्ग, चेंबूर, ट्रॉम्बे या पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री पावसाचे पाणी शिरले होते.

साकीनाका पोलीस ठाण्याची इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्यात संपूर्ण साकीनाका पोलीस ठाणे रात्रभर पाण्याखाली होते. त्याही परीस्थितीत येथील अधिकारी , कर्मचारी स्वतःची तमा न बाळगता नागरिकांच्या मदतीसाठी धावत होते. नेहरूनगर पोलीस ठाण्याची देखील हीच परिस्थिती होती, येथील अधिकारी आणि कर्मचारी टेबलावर बसून काम करीत असल्याचे चित्र दिसत होते. महत्वाच्या गुन्ह्याची कागदपत्रे सांभाळत, येणार्‍या तक्रारी शांतपणे लिहून घेत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -